पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा अंबादास दानवेंनी केला दौरा

 0
पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा अंबादास दानवेंनी केला दौरा

पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा अंबादास दानवेंनी केला दौरा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणीचा घेतला आढावा

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.1(डि-24 न्यूज) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिवसंकल्प मोहिमेअंतर्गत शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवार ता. १ ऑगस्ट रोजी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला.

उस्मानपुरा, क्रांतीनगर, ज्योतीनगर, क्रांती चौक, रामनगर, शिवशंकर कॉलनी, उत्तमनगर, बौद्ध नगर, जवाहर कॉलनी, भानुदासनगर, उल्कानगरी, विश्वभारती कॉलनी, मयूरबन कॉलनी - देवानगरी, शिवाजीनगर, प्रियदर्शनी इंदिरानगर, रामकृष्णनगर, काबरानगर व भारतनगर येथील पदाधिकाऱ्यांची वॉर्डनिहाय प्राथमिक सदस्य नोंदणी व बैठक दानवे यांनी घेतली. 

शिवसेना संपूर्ण वर्षभर चालणारी संघटना असून फक्त निवडणुकीपूरती कार्यक्रम आखणारी नाही. यामुळे संघटनात्मक बांधणीच्या कार्यक्रमासाठी तर लागाच परंतु भविष्यातही पक्षाची ताकद मजबूत राहील यासाठी सुध्दा कम करा. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र विकासाचा संदेश घराघरात पोहोचवा तसेच सोशल मीडियावर राजकीय घडामोडी बाबत भाष्य करत राहा अशी सूचना अंबादास दानवे यांनी शिवसैनिकाना केली. 

याप्रसंगी महानगरप्रमुख राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, शहरप्रमुख विजय वाघचौरे, राजु शिंदे, विधानसभा संघटक सुशील खेडकर, शहरसंघटक सचिन तायडे, दिपक पवार, 

उपशहरप्रमुख प्रमोद ठेंगडे, नितीन पवार, बापू पवार, पप्पू बनसोड, अनिल लहाने, विलास पाटील, विभागप्रमुख पंकज पाटील,साईनाथ महाडिक,विजय पाटील,गोरख सोनवणे, अनिल थोटे, राहूल थोरात, सोमनाथ देवरे, सुनील गोडबोले, धीरज कोकडीया, विशाल राऊत, बाळासाहेब दाभाडे, रोहन अचलीया,सुरेश देशमुख, दिपक महाडिक,स्वप्नील बीडकर,विनोद सोनवणे, विष्णु कापसे, शाखाप्रमुख देविदास पवार, रामदास वाघमारे,कल्याण तिरच्छे, कल्याण चक्रनारायण, मोहन म्हस्के,महिला आघाडी सहसंपर्क संघटक सुनिता आऊलवार, आशाताई दातार, उपाध्ये ताई, काटे ताई, मीना ताई,सुमित्रा हाळनोर, अरुणा भाटी, प्रज्ञा जठार, सविता हाळनोर, सुलोचना मगरे,अश्विनी जहागीरदार, अनिता मल्हारे, मंगलाताई घाडगे,वैशाली हिवराळे, रेणुका जोशी, सुचिता आंबेकर, भारती हिवराळे, स्मिता घोगरे,अरुणा भाटी,कमल पिंपरे, व युवासेना सहसचिव धर्मराज दानवे उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow