सरकारच्या तिजोरीत वक्फ बोर्डाचे 500 कोटीहून अधिक रुपये पडून, ते काढण्यासाठी प्रयत्न सुरू - चेअरमन समीर काझी
सरकारच्या तिजोरीत वक्फ बोर्डाचे 500 कोटीहून अधिक रुपये पडून, ते काढण्यासाठी प्रयत्न सुरू - चेअरमन समीर काझी
सरकारकडून 15 कोटी निधी मिळवणारा देशातील पहिले वक्फ बोर्ड, हज हाऊसमध्ये तात्पूरत्या स्वरुपात वक्फ बोर्डाचे कार्यालय, स्मार्ट सिटीत स्थलांतरित करण्यासाठी ठराव घेणार, पाचच विद्यार्थ्यांनी मदतीसाठी अर्ज दाखल केला...काम अधिक गतीमान करण्यासाठी कार्यालय मोठ्या जागेवर नेण्यासाठी प्रयत्न...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)- आज सकाळपासून हज हाऊस येथे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची बैठक चेअरमन समीर काझी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. या बैठकीत 21 प्रकरणापैकी 10 निकाली काढण्यात आले आहे. मंडळाचे कामकाज अधिक गतिमान व पारदर्शक करण्यासाठी पनचक्की येथील मुख्य कार्यालयात जागा कमी पडू लागल्याने महत्वाचे फाईल व कागदपत्रे सुरक्षित नसल्याने काही विभाग हज हाऊस येथील 15 खोल्यांत तात्पूरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्यात आले होते. परंतु एम आय एम व काही राजकीय आणि सामाजिक संघटनांनी विरोध केला असल्याने मुख्य कार्यालय आमखास मैदानाजवळ स्मार्ट सिटी कार्यालय, छावणी येथील जलजीवन मिशनचे कार्यालय जे वक्फ मालमत्तेवर बांधलेले आहे तेथे स्थलांतरित करण्यासाठी ठराव घेण्यात येणार आहे. हे शक्य झाले आहे तर भाडेतत्वावर मोठी जागा मिळाली तर तेथे स्थलांतरित करण्यात येईल असे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.
त्यांनी पुढे सांगितले महाराष्ट्रात अनेक मालमत्ता ह्या मागिल अनेक वर्षांपासून रस्ते व विविध शासकीय कामासाठी भुसंपादन झाले आहे तो निधी थेट वक्फ बोर्डाला मिळावे यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. अंदाजे 500 कोटीहून अधिक रुपये सरकारच्या तिजोरीत जमा आहे. हि रक्कम वक्फ बोर्डाला मिळाली तर समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी मदत होणार आहे. हि रक्कम परत मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शिष्टमंडळ भेट घेणार आहे. देशातील हे पहिले वक्फ बोर्ड आहे ज्याला राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी 15 कोटी निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे म्हणून बोर्डाचे कामकाज अधिक गतिमान व पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. विधवा व परीतक्त्या, गरजू यांची मुले जी पीएचडी करत आहे अशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्याची योजना सुरू केली आहे परंतु फक्त पाचच विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. योजनेला प्रतिसाद मिळाला नाही असे त्यांनी कबूल केले. लिगल टिम हा वक्फ बोर्डाचा महत्वाचा विभाग आहे. हे मजबूत करण्यासाठी दोन उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश नियुक्त करण्यात येणार आहे यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आतापर्यंत एकच अर्ज आला आहे. वकीलांच्या पॅनेलसाठी अर्जाची संख्या समाधानकारक आली आहे परंतु सेवानिवृत्त न्यायाधीश आणखी पाहिजे यामुळे न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणे निकाली काढण्यासाठी मदत होणार आहे असे त्यांनी सांगितले.
बैठकीत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी, सदस्य एम.यु.पठाण, एड इफ्तेखार हाश्मी, हसनैन शाकेर, मुख्य कार्यकारी अधिकारी फैयाज खान, विशेष अधिक्षक खुसरो खान, आस्थापना विभाग प्रमुख शोएब शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
What's Your Reaction?