रोजाबाग घटना, युवकाच्या खूनातील 7 आरोपी अटक, एक फरार

 0
रोजाबाग घटना, युवकाच्या  खूनातील 7 आरोपी अटक, एक फरार

सिटीचौक पोलिसांची धडाकेबाज कारवाई; खुनाच्या प्रयत्नाप्रकरणी सात जण अटकेत, एक फरार

छत्रपती संभाजीनगर, दि. 26 (डि-24 न्यूज):- काल उशिरा रात्री रोजाबाग परिसरात झालेल्या मारहाणीत नासेर खान तारेक अहेमद वय 21, राहणार शहाबाजार, छत्रपती संभाजीनगर याचा खून झाल्याची तक्रार त्याचा भाऊ आमेर खान तारेख खान यांच्या फिर्यादीवरून सिटी चौक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून शिताफीने सात आरोपींना अटक केली आहे. सिटीचौक पोलिसांनी खुनाच्या गंभीर गुन्ह्यात तातडीने कारवाई करत सात आरोपींना अटक केली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार (IPS), पोलिस उपआयुक्त परिमंडळ-1 पंकज अतुलकर, तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त (शहर विभाग) सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

याबाबत सिटीचौक पोलिस ठाण्यात गु.र.नं. 293/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1), 118(1), 115(2), 125, 352, 351(3), 189(2), 189(4), 190, 191(2), 193(3) तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 4, 5, शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 135 व महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आमेर खान तारेख खान (वय 26, व्यवसाय एसी रिपेअरिंग, राहणार सुमेरा हॉस्पिटलजवळ, शाहाबाजार) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 22 जुलै 2026 रोजी रोजाबाग परिसरात झालेल्या जुन्या वादातून आरोपींनी फिर्यादी व त्यांचा भाऊ नासेर खान तारेख अहमद (वय 21) यांना बोलावून घेत शिवीगाळ करत चाकू व लाकडी काठ्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात नासेर खान गंभीर जखमी झाले असताना घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (गुन्हे) कल्याणकर, पोलिस निरीक्षक, गुन्हे रविंद्र सांगळे, सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, पोलिस उपनिरीक्षक संतोष खरात, भगवत मुठाळ, प्रमोद कोळेकर, पोलिस अंमलदार संजय राठोड, सपोनि/506 मुनीर पठाण, पोहेकॉ/2413 इप्पर, पोशी/2684 मंगेश पंडीत व पोअं/3182 ठाकूर यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू करून आरोपींचा शोध घेत सात जणांना अटक केली.

अटक करण्यात आलेले आरोपी :

शाहिद नुरुद्दीन चारणिया (वय 23, रा. हिमायत बाग, अलसबा सोसायटी, छत्रपती संभाजीनगर)

शेख कदीर शेख रहीम उर्फ अमीन उर्फ माया (वय 23, रा. मेहबूबपुरा)

अयदुर रेहमान पटेल (वय 23, रा. रोजाबाग)

अविनाश अमोल भोसले उर्फ क्रीश बाबा (वय 18, रा. बुद्ध विहार, डी-सेक्टर, एन-13 हडको)

शेख राफे रईसोद्दीन (वय 20, रा. साईग्राम अपार्टमेंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाजवळ, जयरसिंगपुरा)

अक्षय विजय शिरसाठ (वय 21, रा. हरी ओमनगर, हर्सूल परिसर)

शेख काझीम शेख कलीम (वय 17, रा. इकबालनगर, हर्सूल)

फरार आरोपी :

शाहेबाज (रा. सिद्धार्थनगर, एन-12 हडको, छत्रपती संभाजीनगर)

सिटीचौक पोलिसांनी आरोपींना अत्यंत शिताफीने अटक केली असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रविंद्र सांगळे करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow