सिमा दुध डेअरीचे मालक एड युनुस शेख यांच्या अकाली निधनामुळे शोककळा, दफनविधीसाठी हजारोंचा जनसमुदाय लोटला...!

 0
सिमा दुध डेअरीचे मालक एड युनुस शेख यांच्या अकाली निधनामुळे शोककळा, दफनविधीसाठी हजारोंचा जनसमुदाय लोटला...!

सिमा दुध डेअरीचे मालक एड युनुस शेख यांच्या अकाली निधनामुळे शोककळा, दफनविधीसाठी हजारोंचा जनसमुदाय लोटला

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) - रोशन गेट परिसरातील प्रसिद्ध सिमा दुध डेअरीचे मालक एड युनुस मोहम्मद एकबाल (अंदाजे वय 53), राहणार राहत काॅलनी यांचे एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकाली निधनामुळे कुटुंबावर आघात पोहोचला आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे रोशन गेट परिसरात काही काळ दुकाने बंद करुन दफनविधी साठी हजारोंचा जनसमुदाय लोटला होता. ते व्यवसायाने वकील असल्याने मोठ्या प्रमाणात वकील, प्रतिष्ठित नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांची नमाज - ए- जनाजा आज दुपारी दोन वाजता अरीश काॅलनी येथील अरीश मस्जिद येथे अदा करण्यात आली त्यानंतर शहा बाजार येथील काली मस्जिद कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुले, एक मुलगी आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow