वैजापूर मध्ये एसआयआरचे काम शंभर टक्के पूर्ण, जिल्ह्यात प्रथम क्रमांक

 0
वैजापूर मध्ये एसआयआरचे काम शंभर टक्के पूर्ण, जिल्ह्यात प्रथम क्रमांक

वैजापूर विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरीक्षणाचे शंभर टक्के काम पूर्ण

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रथम, विभागात द्वितीय क्रमांक

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5 (डि-24 न्यूज) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR-2026) अंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी. सी. आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली 112-वैजापूर विधानसभा मतदारसंघाने घरोघरी सर्वेक्षण (House-to-House Survey) आणि डिजिटायझेशनचे 100 टक्के काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. दिनांक 5 ऑगस्ट 2026 च्या अधिकृत अहवालानुसार या उल्लेखनीय कामगिरीमुळे वैजापूर विधानसभा मतदारसंघाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रथम, तर छत्रपती संभाजीनगर विभागात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

निवडणूक प्रक्रियेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या, कालबद्ध आणि वैधानिक जबाबदारीचे नियोजनबद्ध पद्धतीने प्रभावीपणे नियोजन करून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने ही कामगिरी साध्य केली आहे.

या मोहिमेचे नेतृत्व मतदार नोंदणी अधिकारी (ERO) तथा उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण दमोधार जऱ्हाड यांनी केले. सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) म्हणून तहसीलदार सुनील रमेश सावंत यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी आनंद व्यंकट गंजेवार, गट विकास अधिकारी ज्ञानदेव अर्जुन जायभाये, नायब तहसीलदार (महसूल-2) रामेवर बाबुराव महाजन, तालुका कृषी अधिकारी व्यंकट सायना ठक्के, मुख्याधिकारी नगर परिषद वैजापूर भागवत उत्तम बिघोत, गट शिक्षणाधिकारी हेमंत केशव उशीर तसेच नायब तहसीलदार (महसूल-1) सुरज गोरख कुमावत यांनी समन्वयाची जबाबदारी पार पाडली.

निवडणूक शाखेच्या केंद्रीय पथकामध्ये नायब तहसीलदार (निवडणूक) दत्तात्रय महादू कांबळे, महसूल सहाय्यक सोमनाथ कमलाकर म्हेत्रे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ओंकार जायराम पारधी, ग्राम महसूल अधिकारी हिनाकौसर नजीर चौगुले, सहशिक्षक तुकाराम पांडुरंग कानवडे तसेच डाटा एन्ट्री ऑपरेटर विजय दत्तात्रय वाळूज यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

या उपक्रमात 35 बीएलओ पर्यवेक्षक, 353 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि 284 बीएलओ सहकारी यांनी बीएलओ अॅप व निवडणूक प्रणालीच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्य करून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले.

अधिकृत SIR स्थिती अहवालानुसार वैजापूर विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या 3 लाख 15 हजार 607 इतकी असून सर्व 3 लाख 15 हजार 607 मतदारांना इन्युमरेशन फॉर्मचे वितरण पूर्ण झाले आहे. तसेच 2 लाख 86 हजार 528 फॉर्मचे डिजिटायझेशन करण्यात आले असून एकूण कामाची शंभर टक्के पूर्तता झाली आहे.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात 24 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यानंतर 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. 24 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबर 2026 या कालावधीत प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी करून त्यांची निकाली प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow