नोटीस मिळाल्यानंतर नगरसेवक पद वाचवण्यासाठी धावपळ सुरू, 25 नगरसेवकांना मनपाची नोटीस

 0
नोटीस मिळाल्यानंतर नगरसेवक पद वाचवण्यासाठी धावपळ सुरू,  25 नगरसेवकांना मनपाची नोटीस

नोटीस मिळाल्यानंतर नगरसेवकपद वाचवण्यासाठी धावपळ; 25 नगरसेवकांना मनपाची नोटीस

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 2 (डि-24 न्यूज): महापालिका निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांत 25 नगरसेवकांना अपात्रतेसंदर्भात महानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आल्याने संबंधित नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे. नोटीस प्राप्त झालेल्या नगरसेवकांनी सुनावणीसाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यास सुरुवात केली असून नगरसेवकपद वाचवण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

महानगरपालिका प्रशासनाकडे एकूण 37 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 25 नगरसेवकांना प्राथमिक सुनावणीसाठी नोटीस देण्यात आली आहे. प्राप्त तक्रारींमध्ये तिसरे अपत्य, अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकाम तसेच गंभीर गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात लपवल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

प्रशासनाच्या माहितीनुसार, नोटीस मिळालेल्या 25 नगरसेवकांपैकी 10 नगरसेवकांवर तिसरे अपत्य असल्याची, तर 7 नगरसेवकांवर अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकामाची तक्रार आहे. तसेच काही नगरसेवकांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचाही आरोप करण्यात आला आहे. काही तक्रारींमध्ये एकापेक्षा अधिक कारणांचा समावेश असल्याने तक्रारींची एकूण संख्या 37 पर्यंत पोहोचली आहे.

महापालिका प्रशासन प्रत्येक नगरसेवकाला स्वतंत्रपणे सुनावणीची संधी देणार असून, संबंधितांकडून स्पष्टीकरण आणि आवश्यक कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. या प्रक्रियेनंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नोटीस बजावण्यात आलेल्या नगरसेवकांची नावे :

१. अभिजित देविदास जिवनवाल

२. गणेश रामजीवन नावंदर

३. श्रीमती नुरजहाँ इकबाल

४. फेरोज खान मोईनोद्दीन खान

५. खान अब्दुल मतीन

६. मोहम्मद वसीम अलीम अहमद

७. सय्यद सोहेल सय्यद महेमूद

८. मेराज खान जलील खान

९. मुन्शी भिकन शेख

१०. श्रीमती शेख नर्गिस सलीम

११. अब्दुल समीर अब्दुल साजिद

१२. श्रीमती भारती महेंद्र सोनवणे

१३. हिवराळे जीवकपाल भीमराव

१४. श्रीमती फरजाना शेख गुलाम रसूल

१५. मोहम्मद वाजेद मोहम्मद अयूब

१६. पठाण मजहर पठाण अयूब

१७. स्वामी विश्वनाथ गुरुलिंग

१८. अली मीर वाजीद

१९. अशोक रंगनाथ हिवराळे

२०. काकासाहेब दामोदर काकडे

२१. सय्यद उसामा अब्दुल कदीर

२२. श्रीमती तरन्नूम अकील अहमद

२३. श्रीमती शाहीन रहीम पटेल

२४. मयूर बन्सीलाल वंजारी

२५. श्रीमती संगीता नितीन सांगळे

महापालिकेच्या या कारवाईमुळे नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, सुनावणीतील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow