पत्रकार तौफिक शहेबाज यांचा इच्छुक उमेदवारीचा अर्ज दाखल, एमआयएमची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा...
पत्रकार तौफिक शहेबाज यांचा इच्छुक उमेदवारीचा अर्ज दाखल, एमआयएमची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) - महापालिका निवडणुकीच्या तयारीला सर्व राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलिल यांचे संपर्क कार्यालय दिल्लीगेट येथे महापालिका निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांसाठी अर्जाचे वितरण सुरू करण्यात आले आहे. इच्छुक आपले अर्ज भरुन 17 डिसेंबर पर्यंत दाखल करु शकतात. प्रभाग 5 मधून जेष्ठ पत्रकार तथा धडाडिचे नेतृत्व तौफिक शहेबाज यांनी आपला इच्छुक उमेदवारीचा अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पत्रकारीतेसोबत ते मागिल अनेक वर्षांपासून समाजसेवेत सक्रीय असल्याने त्यांची लोकप्रियता वाढत आहे. या प्रभागातील मतदारांना वाटते ते सक्षम दावेदार असल्याने पक्षाने तिकीट द्यावे अशी मागणी पत्रकारांच्या व सामान्य नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. तिकीट मिळाले तर आपला विजय निश्चित असा आत्मविश्वास तौफिक शहेबाज यांना वाटत आहे.
What's Your Reaction?