कफनवाल्यांनी सुरू केली अजमेर शरीफ यात्रा, 20 डिसेंबरला रवाना होणार 45 यात्रेकरूंचा जत्था...
कफनवाल्यांनी सुरू केली अजमेर शरीफ यात्रा, 20 डिसेंबरला जाणार 45 यात्रेकरूंचा जत्था
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) - शहरात प्रसिद्ध कफनवाले शफीक अहेमद उर्फ भाई यांनी रोजाबाग, नॅशनल काॅलनी येथे अजमेर शरीफ फॅमिली टुर्सचे शानदार उद्घाटन मुस्लिम धर्मगुरु यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यांनी सांगितले दर महीन्यात हा 45 यात्रेकरुंचा जत्था हजरत ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती अजमेर शरीफ दर्गाचे दर्शन व राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली जाते. 20 डिसेंबरला ऐतिहासिक आमखास मैदान येथून यात्रेकरूंचा जत्था रवाना होईल. प्रती व्यक्ती 7500 रुपये सात दिवसांच्या यात्रेसाठी लागणार आहे. दर्जेदार सेवा व आरोग्य सुविधा बसमध्ये असणार आहे. यात्रेकरूंनी रिदा हज उमराह टुर्सकडे बुकींग करून लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
उद्घाटन प्रसंगी अजमेर शरीफचे खादीम हुसैन चिश्ती, मौलाना नसीम रझवी, सय्यद इलियास अहेमद, सय्यद इकराम अहेमद रज्जाकी, बाबर चांद, मौलाना सलमान कादरी, रफीक अहमद, नासेर सिद्दीकी, तय्यब जफर यांची प्रमुख उपस्थिती होती. सुत्रसंचलन मौलाना नदीम रजा यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत शफिक अहेमद यांनी केले. दुवा नंतर कार्यक्रमांचा समारोप करण्यात आला.
What's Your Reaction?