महापालिका निवडणूक, प्रभाग क्रं.1 मधून शिंदे सेनेची उमेदवारी मागितली मुस्लिम कार्यकर्त्याने...
मनपा निवडणूक, शिंदे सेनेच्या वतीने इच्छूकांचे अर्ज घेण्यास सुरुवात, प्रभाग 1 मधून मुस्लिम कार्यकर्त्याने मागितली उमेदवारी
गेल्या विधानसभा निवडणुकीपासून अनेक मुस्लिम कार्यकर्ते शिवसेनेत काम करत आहे...त्यांना या निवडणुकीत संधी मिळेल का...?
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज)- आजपासून शिवसेनेच्या (शिंदे सेना) संपर्क कार्यालयात महापालिका निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांचे आज आणि उद्या दोन दिवस अर्ज घेण्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने सुरुवात केली आहे. सोमवार पासून मुलाखती घेतल्या जातील असे खासदार संदीपान भुमरे यांनी जाहीर केले आहे. प्रभाग 1 मधून सईदा काॅलनी येथील रहिवासी हाजी हामीदोद्दीन शमशोद्दीन या मुस्लिम कार्यकर्त्याने उमेदवारी मागितली आहे. आज त्यांनी इच्छुक उमेदवारीचा अर्ज आमदार प्रदीप जैस्वाल यांचे सुपुत्र ऋषिकेश जैस्वाल यांच्या कडे सुपुर्द केला आहे. हाजी हामिदोद्दीन हे समाजसेवक मोईन लकी यांचे वडील आहे. त्यांनी वार्डातील विविध विकास कामांसाठी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या कडे येथील नागरीकांच्या सहकार्याने सईदा काॅलनी संघर्ष समितीच्या माध्यमातून पाठपुरावा केला यानंतर येथे मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली अजून काही बाकी आहे ते पूर्ण करण्यासाठी शिवसेनेने उमेदवारी देऊन विकास करण्याची संधी द्यावी अशी मागणी केली आहे.
What's Your Reaction?