महापालिका निवडणुकीची तयारी, प्रभाग 3 मधून उच्चशिक्षित, नवीन युवा चेहरा मैदानात उतरणार..?

 0
महापालिका निवडणुकीची तयारी, प्रभाग 3 मधून उच्चशिक्षित, नवीन युवा चेहरा मैदानात उतरणार..?

महापालिका निवडणुकीची तयारी, प्रभाग 3 मधून नवीन युवा चेहरा मैदानात उतरणार...? निवडणुकीच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - आगामी महापालिका निवडणुकीसाठी आत्तापासूनच इच्छूकांनी गुढघ्याला बाशिंग बांधले आहे. पक्षाचे तिकीट मिळो अथवा न मिळो निवडणुकीची तयारी सुरू केली आहे यामध्ये नवयुवकांची भर पडत आहे. राजकारणात युवकांची इंट्री होताना दिसत आहे. दिल्लीगेट येथील रहिवाशी प्रभाग 3 मधून 36 वर्षीय पदवीधर युवक सय्यद अलीम सय्यद करीम सौदागर यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी दंड थोपटले आहे. दररोज महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी जाऊन ते युवकांचे प्रश्न, अपेक्षा जाणून घेत आहे. या निवडणुकीत युवकांना सर्वच राजकीय पक्ष जास्तीत जास्त उमेदवारी देणार असल्याची माहिती आहे. अलीम सौदागर हे उच्चशिक्षित तरुण असल्याने त्यांनी प्रभागाच्या प्रश्नांचा अभ्यास आत्तापासूनच करायला सुरुवात केली आहे. जेष्ठ नागरिक, महीला, युवक - युवती व जनसामान्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भेटीगाठी सुरू केल्याने सर्व राजकीय पक्षांचे नजरा या युवकाकडे लागले आहे. प्रभागात 46003 एकूण मतदार आहेत त्यापैकी 13467 एससी, 818 एसटी मतदार आहेत. अल्पसंख्याक मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने या निवडणुकीत यश मिळेल अशी अपेक्षा अलीम सौदागर यांनी व्यक्त केली आहे. प्रभाग 3 मध्ये पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, विद्युत काॅलनी, हनुमान टेकडी, साफल्य नगर, पेठे नगर, भावसिंगपुरा पार्ट, भीम नगर पार्ट, कानिफनाथ काॅलनी, जयसिंगपुरा, कुतुब पुरा, पराक्रम काॅलनी हा परिसर या प्रभागात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow