महापालिका निवडणुकीच्या तिकीटासाठी खासदार इम्रान प्रतापगडी यांच्याकडे साकडे...
महापालिका निवडणूक तिकीटासाठी खा. इम्रान प्रतापगडी यांना निवेदन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) अल्पसंख्यांक जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने येणाऱ्या जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देण्यासाठी अल्पसंख्यांकचे विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार इम्रान प्रतापगडी यांना निवेदन निवेदन देण्यात आले.
आज दि. 14 डिसेंबर रोजी दिल्ली येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्याकांच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इमरान प्रतापगडी यांची भेट घेऊन त्यांना छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीत अल्पसंख्यांक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देण्यासाठी एक महत्त्वाचे निवेदन देण्यात आले. यावेळी अल्पसंख्या विभागाचे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम पठाण, अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोइन इनामदार, अहमद चाऊस, आमेर अब्दुल सलीम, इरफान पठाण सय्यद, फराज आबेदी, विकास खन्ना, सोनू शर्मा आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?