पैठण मधून एसडिपिआयचे हाफिज इम्रान यांना उमेदवारी, पक्षाने 8 उमेदवारांची केली घोषणा
पैठण मधून एसडिपिआयचे हाफिज इम्रान यांना उमेदवारी, पक्षाने 8 उमेदवारांची केली घोषणा
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) लोहगाव या छोट्याशा गावातील हाफिज इम्रान यांना एसडिपिआयने पैठण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. हाफिज इम्रान युवा, इंटरनॅशनल कराटे व त्वाईकांदो कोच असल्याने प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. ते नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने राष्ट्रीय कार्यसमिती सदस्य व प्रदेश उपाध्यक्ष सदाशिव त्रिपाठी, राष्ट्रीय कार्यसमिती सदस्य अजहर तांबोळी, राष्ट्रीय उपाध्यक्ष बी. एम. कांबळे यांनी 8 उमेदवा-यांच्या नावाची घोषणा केली. पैठणचे उमेदवार हाफिज इम्रान हे एक दोन दिवसात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून मुजंमील खान, औरंगाबाद पूर्व प्रदेशाध्यक्ष सय्यद कलिम, ठाणे येथील मुंब्रा कळवा सरफराज शेख, जालना येथून असदुल्लाह रजवी, मालेगाव मध्य मधून असदुल्लाह खान इंजिनिअर, नांदेड साऊथ मधून एजाज अहमद, अकोला वेस्ट येथून सोहेल कादरी यांना सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया(एसडिपिय)ने उमेदवारी दिली आहे.
What's Your Reaction?