डि-24 न्यूज इफेक्ट, गुलमंडी प्रभागासाठी पुत्रप्रेम, जैस्वाल-तनवानी आमनेसामने...

 0
डि-24 न्यूज इफेक्ट, गुलमंडी प्रभागासाठी पुत्रप्रेम, जैस्वाल-तनवानी आमनेसामने...

डि-24 न्यूज इफेक्ट, गुलमंडी प्रभागासाठी पुत्रप्रेम, जैस्वाल-तनवानी आमनेसामने

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) - गुलमंडी वार्ड प्रत्येक महापालिका निवडणुकीत चर्चेत असते. तनवानी आणि जैस्वाल यांच्या राजकारणामुळे या प्रभागाला अधिक महत्त्व आहे. आमदार प्रदीप जैस्वाल व माजी आमदार किशनचंद तनवानी हे दोन्ही नेते शिंदे सेनेत असल्याने या निवडणुकीत राजकीय पेच पुत्र प्रेमामुळे फसला असल्याची चर्चा आहे. जैस्वाल आणि तनवानी दोघांच्याही पुत्रांनी गुलमंडी प्रभागातून निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी मागितली आहे. अगोदरच पालकमंत्री संजय शिरसाट व जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील तणाव निवळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मध्यस्थी करावी लागली आता पुन्हा शिंदे सेनेत वाद उफाळला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत उध्दव सेनेची उमेदवारी नाकारुन हिंदू मतांचे विभाजन होवू नये म्हणून तनवानी यांनी माघार घेतली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मतांचे विभाजन झाल्याने इम्तियाज जलिल यांची आमदार बनण्याची लाॅटरी लागली होती मग याची परतफेड म्हणून ऋषीकेश जैस्वाल यांना या प्रभागातून उमेदवारी न देता दुस-या प्रभागातून तिकिट द्यावे मी दिलेला त्याग विसरु नये त्याची परतफेड करत माझा मुलगा चंदू उर्फ बंटी तनवानीला तिकीट मिळायला हवे. किशनचंद तनवानी यांचे भाऊ राजू तनवानी हे गेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले होते. यंदा गुलमंडी हा प्रभाग झाल्याने मतदारांची संख्या वाढली आहे. काल डि-24 न्यूजने आजी-माजी आमदार पुत्र प्रेमामुळे आमनेसामने या मथळ्याखाली प्रकाशित केली यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. यानंतर आमदार प्रदीप जैस्वाल व माजी आमदार किशनचंद तनवानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ती प्रतिक्रिया आपल्या वाचकांसाठी देत आहोत.

काय म्हणाले प्रदीप जैस्वाल...

कसला त्याग...? आम्ही विकासाची कामे करुन निवडून आलो आहे. एका गुलमंडी वार्डातून निवडून येता येत नाही. प्रभाग मोठा असतो. समिती तिकीट मुलगा म्हणून नाही तर कामामुळे दिले जाईल. ऋषिकेश जैस्वालला गुलमंडीतून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तनवानी माझे मित्र आहेत माझ्या मुलाने त्यांची भेट घेऊन अगोदरच सांगितले आहे मी गुलमंडीतून लढणार आहे आम्ही दोघे बसून तोडगा काढू यामध्ये वाद होणार नाही पक्ष नेतृत्व कोणाला उमेदवारी द्यायची निर्णय घेतील तो निर्णय मान्य करु. 

काय म्हणाले माजी आमदार किशनचंद तनवानी...

गेल्या विधानसभा निवडणुकीत त्याग करून आमदार प्रदीप जैस्वाल हे निवडून यावे म्हणून दोस्ती निभावली परंतु बंटी तनवानीला तिकीट मिळायला हवे यासाठी पुत्रप्रेमामुळे या दोस्ती मध्ये मिठाचा खडा पडतो की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तनवानी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले मी त्याग केला आहे माझा हा परंपरागत वार्ड आहे. माझा भाऊ या वार्डातून अपक्ष निवडून आला होता. म्हणून आमचा हा हक्काचा वार्ड असल्याने पक्षाने उमेदवारी माझ्या मुलाला द्यायला पाहिजे. जैस्वाल हे आमदार आहेत ते अन्य प्रभागातून मुलाला निवडून आणू शकतात. ते ओबीसी आहेत समर्थनगर येथे राहतात तेथे ओबीसी जागा सुटलेली आहे तेथून मुलाला उभे करावे. मी त्यांची भेट घेऊन बोलणार आहे. मी हिंदूत्वासाठी त्याग केला आहे त्यांनी विसरु नये दोघे बसून मार्ग काढू वाद होतील असे वाटत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील. सध्या माझ्याकडे लोकसभा संपर्क प्रमुखाचे पद आहे. पण मला कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात नाही. पेपरला बातमी आली का कळते. जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे माझे ज्युनिअर आहे पण तरीही याबाबत त्यांच्याशी बोलणार आहे. माझा भाऊ या वार्डातून जिंकला होता म्हणून आमचा दावा रास्त असल्याचे ते बोलले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow