जोपर्यंत मार्टीची स्थापना होत नाही मत मागायला यायचे नाही, मुस्लिम समाजाचा कडक इशारा

 0
जोपर्यंत मार्टीची स्थापना होत नाही मत मागायला यायचे नाही, मुस्लिम समाजाचा कडक इशारा

जोपर्यंत मार्टीची स्थापना होत नाही मत मागायला यायचे नाही, मुस्लिम समाजाचा इशारा

औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज) विविध समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बार्टी, सारथी, महाज्योती स्वायत्त संस्था स्थापन करुन निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्याच धर्तीवर मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मार्टी(मौलाना आझाद संशोधन एण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचा निर्णय आगामी हिवाळी अधिवेशनात घ्यावा या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर कृती समितीच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक अनशन करण्यात आले. 

दिलेल्या मुदतीत हा निर्णय घेण्यात आला नाही तर आगामी निवडणुकीत सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधीपक्ष या नेत्यांनी मत मागायला येऊ नये असा इशारा समाजसेवक मोहंमद हिशाम उस्मानी यांनी आपल्या भाषणात दिला आहे. हि मागणी घेऊन आता काका, मामा, दादा यांच्याकडे जाण्याची गरज नाही तेच आपल्याकडे येण्याची वेळ निवडणुकीत येणार आहे त्यावेळी त्यांना समाजाने मराठा समाजासारखा धडा शिकवा असा कडक शब्दात इशारा दिला आहे.

मौलाना आझाद संशोधन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कृती समितीचे अध्यक्ष एड अजहर पठाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवून मागणीचे निवेदन दिले. अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी आश्वासन दिले. समाजवादी चे आमदार अबु असिम आझमी यांनी व विविध पक्षांचे आमदारांनी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली जाईल. शरद पवार गट, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत आश्वासन दिले हा मुद्दा राष्ट्रवादीचे आमदार अधिवेशनात उपस्थित करतील. जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही राष्ट्रवादी आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. मागिल चार वर्षांपासून या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे.

यावेळी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे नेते हामद चाऊस, राष्ट्रवादी चे नेते इलियास किरमानी, मोहंमद हिशाम उस्मानी, काँग्रेसचे माजी नगरसेवक अयूब खान, इंजि वाजिद कादरी, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस प्राचार्य शेख सलीम, मिर्झा सलिम बेग, सिनेट सदस्य शेख जहुर खालिद, रमजानी खान, एसडिपिआयचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन, शिवसेनेचे समीर कुरेशी, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष मोहंमद ताहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अब्दुल कय्यूम, सोमिनाथ शिराणे, हाफिज असरार ,प्रशांत जगताप, समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष फैसल खान, एड शेख वसीम, सर आसिफ, सय्यद अब्दुल रहेमान, एम.डी.तय्यब, सय्यद लईकोद्दीन, साजिद पटेल, शेख मुख्तार, डॉ.अफसर शेख, सतिश वानखेडे, जाहेद अल कसेरी, डॉ.आमेर पठाण, इम्रान बाशवान, शेख मतीन, अनिस रामपूरे, एजाज खान, शेख हज्जू, अब्दुल अजीम, डॉ.सिद्दीकी मो.फैजुद्दीन आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. विभागीय आयुक्त यांना शिष्टमंडळाने आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow