झोपडपट्टीतील नवीद बनणार काँग्रेसचा नगरसेवक...? प्रभाग 6 मधून प्रमुख दावेदार...!
झोपडपट्टीतील नवीद बनणार काँग्रेसचा नगरसेवक...? प्रभाग 6 मधून प्रमुख दावेदार...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) - मागिल 25 वर्षांपासून काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेवून विविध पदांवर काम करणारे हर्षनगर या झोपडपट्टीतील रहीवासी नवीद शेख रशीद प्रभाग 6 मधून महापालिका निवडणुकीत नगरसेवक बनणार अशी चर्चा नागरीकांमध्ये जोरात सुरू आहे. सर्वसाधारण जागेतून काँग्रेसच्या वतीने ते प्रमुख दावेदार मानले जात आहे. काँग्रेसचे आला कमान त्यांना उमेदवारी देऊन निवडणूक लढण्याची संधी देतील अशी अपेक्षा येथील सर्व जाती धर्मातील मतदारांना वाटते. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे उमेदवारी देण्यासाठी निर्णय घेतील अशी आशा व्यक्त केली आहे.
स्व.मा.मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) शहराचे विकासाचे शिल्पकार डॉ.रफीक झकेरिया, माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेवर त्यांचा अविरत राजकीय प्रवास सुरू आहे. या प्रभागात पूर्वीचा वार्ड क्रं.13, विश्वासनगर - लेबर काॅलनी हा काँग्रेसचा गड राहिलेला आहे. श्रीमती मसर्रत बेगम युनुस पटेल, अयूब खान यांनी या वार्डाचे प्रतिनिधित्व केल्याने आगामी महापालिका निवडणुकीत यश मिळवण्यासाठी जमेची बाजू आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर डॉ.रफिक झकेरिया यांच्यानंतर थांबलेला शहराचा सर्वांगीण विकास पुढे नेण्याचा संकल्प व निर्धार नवीदने केला आहे. झकेरिया यांच्यानंतर थांबलेला राजकीय मागासलेपण दुर करण्याचा प्रयत्न ते करणार आहे. प्रभागातील अनेक माजी नगरसेवक, प्रतिष्ठीत नागरिक, युवक व जेष्ठ नागरिकांचा हि निवडणुकीसाठी पाठिंबा मिळत आहे. असे त्यांनी म्हटले.
नवीद शेख यांना स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना व विविध सामाजिक राजकीय पक्षांची साथ मिळू शकते. त्यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते स्व.अन्वर शेरखान, जेष्ठ समाजसेवक डॉ.राजेंद्र दाते पाटील हे राजकीय गुरु असताना एनएसयुआयचे शहर उपाध्यक्ष, युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष, एड सय्यद अक्रम शहराध्यक्ष असताना शहर सचिव तर सध्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे शहर उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. पक्षाचे कार्यालय गांधी भवन येथे शहराध्यक्ष युसुफ शेख यांच्याकडे नोव्हेंबर महिन्यात प्रभाग 6 मधून काँग्रेसच्या वतीने इच्छूक उमेदवारीचा अर्ज दाखल केला. स्थानिक वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद व प्रभागातून सर्वे केल्यास नक्की नवीद शेख यांना उमेदवारी द्या हा निष्कर्ष निघेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी विनंती केली आहे.
प्रभाग क्रमांक 6, मध्ये येणारे वस्त्या...
या प्रभागात एकूण लोकसंख्या 42346, एससी 3849, एसटी 381 आहे. या प्रभागात जास्तीत जास्त मुस्लिम बहुल वस्त्या असल्याने काँग्रेस पक्षाला फायदा मिळू शकतो असे राजकीय जाणकारांचे मत आहे. या प्रभागात देवडी बाजार, गेंदा भवन, मोहन टाॅकीज, मुर्गी नाला, फाजलपुरा, नवाबजानी गल्ली, मोहनलाल नगर, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, सुभेदारी गेस्ट हाऊस, शाह बाजार, काचिवाडा, चाऊस काॅलनी, एसटी काॅलनी, अरीश काॅलनी, त्रिवेणी नगर, औरंगाबाद टाइम्स काॅलनी, न्यू एसटी काॅलनी हा परिसर येतो.
What's Your Reaction?