अधिवेशनात एनएसयुआयचा विधानसभेला घेराव, हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग...
अधिवेशनात एनएसयूआयचा विधानसभेला घेराव, हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग...
नागपूर, दि.13(डि-24 न्यूज)- महाराष्ट्र एनएसयूआयच्या वतीने हिवाळी अधिवेशनात विधानसभेचा घेराव आंदोलन यशस्वीरीत्या पार पडला. हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआयचे अध्यक्ष सागर साळुंके यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते.
या आंदोलनात राज्याच्या विविध भागांतून हजारो विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सरकारसमोर आपल्या हक्कांसाठी ठामपणे आवाज उठवला. विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी स्पष्ट शब्दांत मांडण्यात आली— “नोकरी द्या, नाहीतर भत्ता द्या, नाहीतर राजीनामा द्या!”
विधानसभा घेरावापूर्वी इंदोरा मैदानात भव्य जनसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआयचे उपाध्यक्ष डॉ. शादाब शेख यांनी संबोधित केले. सभेनंतर काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व त्यांनी प्रदेशाध्यक्षांसोबत केले.
सभेनंतर मोर्चा विधानसभेकडे मार्गस्थ झाला असता पोलीस प्रशासनाने एलआयसी चौकात मोर्चा अडवला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआयचे अध्यक्ष, पदाधिकारी व अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर सर्वांची सुटका करण्यात आली.
हा संपूर्ण विधानसभा घेराव व जनसभा महाराष्ट्र एनएसयूआयचे प्रभारी अक्षय यादव, क्रांतिवीर आणि दुष्यंत राजपुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. हे आंदोलन ‘निर्णायक संघर्ष’ या अभियानांतर्गत राबवण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या प्रचंड सहभागामुळे आता विद्यार्थी केवळ प्रतीक्षा न करता संघटित संघर्षाच्या माध्यमातून आपले हक्क मिळवणार, हे स्पष्ट झाले आहे. युवकांच्या वर्तमान व भविष्य सुरक्षित करण्यासाठी हे आंदोलन एक ठोस आणि निर्णायक संदे
श ठरले आहे.
What's Your Reaction?