जन सुरक्षा विधेयक विरोधात क्रांती चौकात धरणे आंदोलन करणार महाविकास आघाडी...

 0
जन सुरक्षा विधेयक विरोधात क्रांती चौकात धरणे आंदोलन करणार महाविकास आघाडी...

जन सुरक्षा विधेयक विरोधात क्रांती चौकात धरणे आंदोलन करणार महाविकास आघाडी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज) - लोकशाही आणि लोकशाही मार्गाने करण्यात येणाऱ्या आंदोलन चिरडण्याचा घाट घालणाऱ्या महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक - 2025 च्या विरोधात जन सुरक्षा विरोधी कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शहरातील क्रांती चौकात 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हे आंदोलन पार पडणार असून त्याच्या पूर्वतयारीनिमित्त आज रविवार 7 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडी व विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. 

10 सप्टेंबर व 2 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र स्तरावर जिल्हा व तालुका पातळीवर या जन सुरक्षा विरोधी कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्याचे ठरविले आहे. लोकशाही आणि लोकशाही मार्गाने करण्यात येणारे आंदोलन दडपण्यासाठी तसेच विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी सदरील विधेयक आल्याने लोकशाही व्यवस्थेला मोठी हानी पोहोचत असल्याने राज्य सरकारच्या या कृतीला आपल्याला हाणून पाडायचे असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते अंबादास दानवे, खासदार डॉ. कल्याण काळे व स्वराज्य अभियानचे सुभाष लोमटे यांनी केले. 

याप्रसंगी काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष शेख युसूफ, भाकपचे काॅ. राम बाहेती, काॅ. अॅड. अभय टाकसाळ, माकपचे काॅ. भगवान भोजने, भारतीय दलित पॅंथरचे रमेश भाई खंडागळे, शेकापचे प्राध्यापक उमाकांत राठोड, लाल निशान पक्षाचे कॉम्रेड भीमराव बनसोड, शिक्षक संघटनेचे सुभाष मेहेर,समाजवादी पार्टीचे आयुब खान, फैसल खान, रवींद्र काळे, अनिल चोरडिया, महानगरप्रमुख राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, हरीभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, बाळासाहेब थोरात, महिला आघाडी संपर्क संघटक सुनिता आऊलवार, सहसंपर्क सुनिता देव, दुर्गा भाटी, अनिता मंत्री, महानगर संघटक सुकन्या भोसले, शहर संघटक सुनिता सोनवणे, सुनिता औताडे व मीरा देशपांडे उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow