22 जानेवारीला ठरेल महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव, लागले राज्याचे लक्ष...

 0
22 जानेवारीला ठरेल महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव, लागले राज्याचे लक्ष...

22 जानेवारीला ठरेल महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी, लागले राज्याचे लक्ष...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज) - राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचे निकाल 16 जानेवारीला लागले आता महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरक्षण ठरवण्यासाठी नगरविकास विभागाकडून 22 जानेवारीला सोडत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे. मंत्रालयातील परिषद सभागृहात सहाव्या मजल्यावर सकाळी 11 वाजता हि बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे. महापौर पदाचे आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तास्थापनेसाठी महत्वाचे मानले जाते. मुंबई महापालिकेचे महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होईल याकडे अधिक लक्ष सर्व राजकीय पक्षांचे लागले आहे. नगरविकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी आज महापौर आरक्षण सोडतीसाठी पत्र जारी केले आहे. आरक्षण निश्चितीचा निर्णय नगरविकास मंत्री यांच्या निर्देशानुसार घेतला जातो. सोडतीच्या पत्राची प्रत मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, संबंधित अधिका-यांना पाठवली आहे. आरक्षण सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow