शिंदे सेनेचे पहिल्याच दिवशी 536 इच्छूकांनी नेले अर्ज, गुलमंडी प्रभागासाठी पुत्र प्रेमामुळे आजी माजी आमदार आमनेसामने येण्याची शक्यता

 0
शिंदे सेनेचे पहिल्याच दिवशी 536 इच्छूकांनी नेले अर्ज, गुलमंडी प्रभागासाठी पुत्र प्रेमामुळे आजी माजी आमदार आमनेसामने येण्याची शक्यता

शिंदे सेनेचे पहिल्याच दिवशी 536 इच्छूकांनी नेले अर्ज, आजी आमदार-माजी आमदार पुत्र प्रेमामुळे नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता... इच्छूकांची संख्या वाढत असताना बंडखोरीचा धाक वाढला...? गुलमंडी प्रभागातील राजकीय समीकरणे काय बघतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - आमदार प्रदीप जैस्वाल व माजी आमदार किशनचंद तनवानी यांच्या राजकारणाची सुरुवात गुलमंडी वार्डातून झाली. गुलमंडीत सर्वात पहिली शिवसेनेची शाखा सुरू झाली तेव्हापासून या वार्डात नगरसेवक बणण्यासाठी कांटे की टक्कर बघायला मिळाली. आजी माजी आमदार पुत्र गुलमंडी प्रभागातून राजकारणाची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. एक आहेत शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल यांचे सुपुत्र ऋषिकेश जैस्वाल तर गेल्या विधानसभा निवडणुकीत माघार घेवून शिंदे सेनेत प्रवेश करत प्रदीप जैस्वाल यांना पाठींबा दिलेले माजी आमदार किशनचंद तनवानी यांचे सुपुत्र चंदु उर्फ बंटी तनवानी हे रिंगणात उतरण्याची तयारी करत आहे. दोन्ही आजी माजी आमदार पुत्रांचा मुकाबला या प्रभागातून बघायला मिळेल यात आश्चर्य वाटायला नको. कारण दोघांनीही याच प्रभागातून इच्छुक उमेदवारीचा अर्ज घेतल्याने दोन्ही कुटुंबात नाराजी नाट्य बघायला मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

माजी आमदार किशनचंद तनवानी यांना शिंदे सेनेच्या वतीने एमएलसी मिळेल अशी शक्यता होती परंतु असे झाले नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत तनवानी यांनी माघार घेतली होती तर महापालिका निवडणुकीत पुत्र प्रेमामुळे प्रदीप जैस्वाल हे ऋषिकेश जैस्वाल यांना माघार घ्यायला लावतील की वरिष्ठ नेत्यांना मध्यस्थी करावी लागेल हे येणा-या काही दिवसांत कळेल.

संपर्क कार्यालयात शुक्रवारपासून इच्छूकांना अर्जाचे वितरण सुरू झाले आहे. शुक्रवार व शनिवारी दोन दिवस अर्जाचे वितरण होईल व सोमवारपासून इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या जातील. असे खासदार संदीपान भुमरे यांनी जाहीर केले आहे. समन्वय समितीमध्ये आमदार प्रदीप जैस्वाल व माजी आमदार किशनचंद तनवानी हे सुद्धा आहे परंतु पुत्रप्रेम कोणाला पावते हे लवकरच कळेल. अजून निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरीही इच्छूकांनी बॅनरबाजी, पोस्टरबाजी सोशलमिडियावर करायला सुरुवात केली आहे. परंतु उमेदवारी मिळवण्यात कोण बाजी मारेल हे बघावे लागेल. 

नागपूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन पालकमंत्री संजय शिरसाट व जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर जंजाळ हे महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले. पालकमंत्री संजय शिरसाट मुख्य समन्वयक, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, माजी महापौर नंदकुमार घोडेले, ऋषीकेश प्रदीप जैस्वाल, विकास जैन, किशनचंद तनवानी, अशोक पटवर्धन, त्र्यंबक तुपे यांचा समन्वय समितीमध्ये समावेश आहे. परंतु जैस्वाल व तनवानी यांच्यामध्ये नवीन वाद उफाळण्याची चर्चा गुलमंडीच्या तिकीटावरुन रंगण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महायुतीत लढणार असल्याचे शिंदे सेनेच्या नेत्यांनी सांगितले तरी सर्व कार्यकर्त्यांना कसे न्याय देणार हे मोठे आव्हान या निवडणुकीत आहे. इच्छूकांच्या अर्जात सामाजिक वर्गीकरणाची माहिती मागवल्या ने इच्छूकांची डोकेदुखी वाढली आहे. खासदार संदीपान भुमरे यांनी सांगितले पक्षात आता कोणताही वाद नाही, महायुतीत महापालिका निवडणूक लढणार आहे. स्पर्धा वाढल्याने दोन शिवसेना झाल्याने नवीन जुने व पक्षासाठी काम केले हे बघूनच उमेदवारी दिली जाणार असल्याचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले. पहिल्याच दिवशी 536 इच्छूकांनी अर्ज घेतले हा आकडा एक हजार पर्यंत जाण्याची शक्यता आहे अशी माहिती एका कार्यकर्त्याने सांगितली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow