एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त मेगा मेडीकल कैम्पचे आयोजन

 0
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त मेगा मेडीकल कैम्पचे आयोजन

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त मेगा वैद्यकीय शिबिराचे आयोजन...

सलग अकराव्या वर्षी हाजी इसाक खान यांचा समाजोपयोगी उपक्रम...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज)- एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध जनसेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक 12 मधील किराडपुरा परिसरातील फैज कॉम्प्लेक्सजवळ 10 ऑगस्टला सकाळी 10 ते सायंकाळी 2 वाजेपर्यंत भव्य मोफत मेगा वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हा समाजोपयोगी उपक्रम सलग अकराव्या वर्षी आयोजित करण्यात येत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शारेक नक्शबंदी यांनी दिली.

ते म्हणाले की, इम्तियाज जलील यांनी शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून विविध सामाजिक व जनहिताचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. समाजसेवेच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मेगा वैद्यकीय शिबिराचे आयोजक हाजी इसाक खान यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक 12 मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येतो. दरवर्षी या शिबिरातून हजारो रुग्णांना मोफत तपासणी, उपचार व औषधांचा लाभ दिला जातो.

यावर्षीच्या शिबिरात विविध आजारांची तपासणी, निदान, डोळ्यांची तपासणी तसेच मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय आवश्यक औषधांचेही मोफत वितरण करण्यात येणार आहे.

नगरसेवक म्हणून समाजाप्रती असलेली जबाबदारी लक्षात घेऊन वर्षभर विविध जनकल्याणकारी उपक्रम राबविले जात असल्याचे सांगत, परिसरातील सर्व गरजू नागरिकांनी या मोफत वैद्यकीय शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन हाजी इसाक खान यांनी केले.

यावेळी एमआयएमचे शहराध्यक्ष नासेर सिद्दीकी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित

होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow