उल्मा बोर्ड मुतवल्ली विंग पुणे शहर व जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित...
उल्मा बोर्ड मूतवल्ली-विंग पुणे शहर आणि जिल्ह्याची कार्यकारणी घोषित...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) -उल्मा बोर्ड मूतवल्ली विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष शेख फैसल मोहम्मद इकबाल यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना नौशाद सिद्दीकी आणि महासचिव अल्लामा बुनई हस्नी यांच्याशी चर्चा करुन पुणे शहर जिल्हाची 27 मार्च शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता अग्रवाल कॉलनी भवानी पेठ येथे संपर्क कार्यालयात राष्ट्रीय उपाध्यक्ष सलीम ए .आर बागबान (मूतवल्ली विंग), महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमान सलीम बागबान (शिक्षण विभाग) यांच्या सह पुणे जिल्हा अध्यक्ष आलमगीर युसूफ कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष सज्जन अय्युब इनामदार, पुणे शहर महिला अध्यक्षा किरण रशीद शेख, उपाध्यक्ष रशिद हुसेन पठाण, अब्बास बागवान, हनीफ पठाण सचिव, सलीम शेख मिडिया पुणे अध्यक्ष, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष जाविदमियाँ जहागिरदार, पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा कमरूनीसा शेख, हुसेन शाहिद शहा तालुका अध्यक्ष शिरूर यांच्या सह मोठ्या संख्येने नियुक्ती करण्यात आली.
या वेळी फैसल मुजावर यांनी सांगितले की भारतातील महाराष्ट्र सह वक्फच्या जमीनी जतन करणे संदर्भात ऑल इंडिया उलमा बोर्ड मुतवल्ली विंगची स्थापना करण्यात आली असुन रेल्वे विभागानंतर भारतात वक्फची संपत्ती दुसरे क्रमांकावर येत आहे. या वक्फ जमीनींचे खरे उपयोग समाजहितासाठी झाले तर कोणीही उपाशी आणि बैरोजगार राहणार नाही. यासाठी वक्फ बोर्डच्या जमीनीचे जतन करने, अनाधिकृत ताबेमारी यासाठी मुतवल्ली, ट्रस्टी, मदरसे, आशुरखाना, कब्रस्तान, चिल्ला, दर्गा, मस्जिद, यतीमखाना अशा प्रकारच्या सर्व प्रकरणात मुतवल्ली, ट्रस्टी यांना होत असलेल्या त्रासाबद्दल लोकशाही मार्गाने आवाज उठविण्यासाठी तसेच वक्फ जमीनी वाचविण्यासाठी प्रयत्न करणे कामी संघटना काम करणार असल्याचे ऑल इंडिया उलमा बोर्ड मुतवल्ली विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष शेख फैसल मोहम्मद इकबाल यांनी सांगितले आहे.
लवकरच संघटनेची नुतन जिल्हा कार्यकारिणी जाहिर करणार असुन जिल्ह्यातील मदरसे, आशुरखाना, कब्रस्तान, चिल्ला, दर्गा, मस्जिद, यतीमखानाच्या मुतवल्ली ट्रस्टी आपले नाव संघटनेत नोंदवावे असे नवनियुक्त सलीम ए .आर बागबान यांनी आव्हान केले आहे. यावेळी उल्मा बोर्डचे सर्व सेलचे पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती.
What's Your Reaction?