सरकारने आंदोलक विद्यार्थ्यांना त्रास देने थांबवले नाही तर ते युवक सरकारही बदलतील - अभिजित दिपके
विद्यार्थ्यांना त्रास देने बंद केले नाही तर सरकारही बदलतील युवक - अभिजित दिपके
40 दिवसांनंतर घरी परतला अभिजित
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) - दिल्ली येथील जंतरमंतरवर झालेल्या यशस्वी आंदोलन संपल्यानंतर सिजेपीचे संस्थापक अभिजित दिपके 40 दिवसांनंतर छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाले. आई वडीलांची भेट घेण्यासाठी ते आले आहे. त्यांची भेट म्हणजे आनंदाचा क्षण असेल अशी प्रतिक्रिया देताना त्याने सांगितले.
दिल्ली व इतर राज्यात नीट परीक्षा लिक प्रकरणाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी बुलंद आवाज उठवला. लाठ्या काठ्या विद्यार्थ्यांना खाव्या लागल्या यानंतर सरकार झुकले त्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. परंतु विविध राज्यांतील दिल्ली सहीत आंदोलक विद्यार्थ्यांना त्रास देणे सुरू आहे. सरकारने हे थांबवावे. विद्यार्थ्यांना अटक करण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत ते आंदोलक विद्यार्थी आहे आतंकवादी नाही. सरकारने त्रास देने थांबवले नाही तर सरकार बदलण्याची ताकद या युवकांमध्ये आहे असा कडक इशारा अभिजित दिपके यांनी दिला आहे.
What's Your Reaction?