व्हाईट पेपर परीक्षा केंद्राची शिष्यवृत्ती परीक्षा उत्साहात संपन्न
व्हाइट पेपर परीक्षा केंद्राची शिष्यवृत्ती परीक्षा उत्साहात संपन्न
सुमारे १ हजार विद्यार्थी सहभागी; थेट केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्यांनाही परीक्षेची संधी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)-एमएचटी-सीईटी, जेईई आणि नीट या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्हाइट पेपर परीक्षा केंद्रातर्फे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ रविवारी, २७ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथील परीक्षा केंद्रावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या परीक्षेला सुमारे १ हजार विद्यार्थी सहभागी झाले.
इयत्ता ११वी, १२वी तसेच पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेचा उद्देश गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला पाठबळ देणे हा आहे. परीक्षेसाठी पूर्वनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसह काही विद्यार्थी थेट परीक्षा केंद्रावर आले आणि त्यांनी परीक्षेला बसण्याची विनंती केली. विद्यार्थ्यांच्या विनंतीचा विचार करून केंद्र व्यवस्थापनाने त्यांनाही परीक्षेत सहभागी होण्याची संधी दिली.
या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणांच्या आधारे रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. ९१ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपये, ८६ ते ९० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ हजार रुपये, तर ८१ ते ८५ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ११ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
इयत्ता ११वीच्या विद्यार्थ्यांसाठीही विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची १०० टक्के शैक्षणिक दत्तक योजनेसाठी निवड केली जाऊ शकते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी व्हाइट पेपर परीक्षा केंद्राकडून घेण्यात येणार असल्याचे परीक्षेच्या माहितीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
परीक्षेसाठी इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांना गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांवर आधारित अभ्यासक्रम देण्यात आला होता. तसेच इयत्ता ११वीच्या विद्यार्थ्यांसाठीही गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांचा समावेश करण्यात आला होता.
व्हाइट पेपर परीक्षा केंद्र हे एमएचटी-सीईटी, जेईई आणि नीट या स्पर्धात्मक परीक्षांसाठी विशेष सराव चाचणी मालिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सराव व मार्गदर्शन देणारे केंद्र आहे. गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षा यशस्वीपणे पार पडल्याबद्दल केंद्र व्यवस्थापनाने सहभागी विद्यार्थी, पालक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
व्हाइट पेपर परीक्षा केंद्र
पत्ता : आनंदी बिल्डिंग, प्लॉट क्र. ८१ व ८३,
एलोरा डायग्नोस्टिकच्या समोर, व्यंकटेश नगर,
ॲपेक्स हॉस्पिटल रोड,
औरंगाबाद – ४३१००१
संपर्क : ९९२२११४४३४ / ९९२२११४४१७
What's Your Reaction?