नवाबपु-यात मनपाने काढली तीन अतिक्रमणे

नवाबपुरा ते मोंढा 15 मीटर रुंद विकास योजना रस्तावर तीन अतिक्रमण निष्कासित
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)
आज नवाब पुरा ते मोंढा कडे जाणाऱ्या 15 मीटर रुंद विकास योजना रस्तावर तीन बाधित दुकाने निष्कासित करण्यात आली.
विशेष म्हणजे अतिक्रमण धारक बाधित जागेचा मोबदला घेऊन ही ताबा सोडत नव्हता. सदरील जागेवर तीन दुकाने बांधून भाडेतत्त्वावर दिली होती. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांचे आदेशानुसार आज हि कारवाई करण्यात आली.
नगर भूमापन क्रमांक 8613 या मिळकतीच्या हक्क सोड प्रमाणपत्र अन्वय महानगर पालिके द्वारा मोबदला दिल्यानंतर महानगरपालिकेचे नावे झालेली असतानाही पूर्वीचे मालकांनी ताबा न सोडता पालिकेच्या जागेवर दुकाने बांधून भाडे तत्त्वावर दिल्याने संबंधितांना आठ दिवसापूर्वीच सदरील जागा रिकामी करणेबाबत सूचना देण्यात आली होती. तथापि संबंधितांनी यावर कोणतेही विचार न केल्याने तसेच राजा बाजार चौराहा वर देखील अशाच प्रकारच्या मोबदला देऊनही सदर ठिकाणी मोबाईलचे व इतर दुकान महानगरपालिकेतर्फे प्रशासक महोदय यांचे आदेशानुसार सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक 2 रमेश मोरे व इमारत निरीक्षक मजहर अली यांनी अतिक्रमण यंत्रणा वापरून जेसीबी द्वारे सदरील बांधकाम निष्कासित केले.
What's Your Reaction?






