अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, अर्ज मागवले

अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना
विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती;अर्ज मागविले
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)- अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी विदेशात पदव्युत्तर पदवी व पीएच.डी अभ्यासक्रमासाठी शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. योजनेची सविस्तर माहिती व जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दि. 1 ऑगस्ट 2025 आहे. अर्ज आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, 3 चर्च पथ, पुणे – 01 या पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण आर. एम. शिंदे यांनी केले आहे.
What's Your Reaction?






