फुलंब्री नगरपंचायत नगरसेवकाला अपात्र ठरवण्यासाठी नोटीस, जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर करण्याचे आदेश

 0
फुलंब्री नगरपंचायत नगरसेवकाला अपात्र ठरवण्यासाठी नोटीस, जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर करण्याचे आदेश

फुलंब्री नगरपंचायतीच्या नगरसेवकाला अपात्र ठरविण्याबाबत नोटीस...

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण व माहिती लपविल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज)- फुलंब्री नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवक सुषमेष राजू प्रधान यांना अपात्र ठरविण्याच्या प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नोटीस बजावण्यात आली आहे. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम ४४ व १६ अन्वये ही कार्यवाही करण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे नगरपालिका प्रशासन सहआयुक्त सौरभ जोशी यांनी फुलंब्री नगरपंचायतीचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत.

निवेदनानुसार, फुलंब्री प्रभाग क्रमांक ९ चे शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सुषमेष राजू प्रधान यांच्याविरोधात अमित मच्छींद्र वाहुळ यांच्या तक्रारीवरून शासकीय जमिनीवरील अतिक्रमण तसेच माहिती लपविल्याच्या प्रकरणात शासनाकडून नोटीस काढण्यात आली आहे.

या प्रकरणी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना दि. ०९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या तक्रारीच्या अनुषंगाने तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

त्यामुळे नगरसेवक सुषमेष राजू प्रधान यांच्यावरील आरोपांची चौकशी होऊन पुढील कार्यवाही काय होते, याकडे फुलंब्रीतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow