पिशोर, 12 वर्षांपासून एकच डाॅक्टर प्रभारी म्हणून कार्यभार सांभाळत असल्याचे ऐकून मंत्र्यांचे ओएसडी झाले आवाक...

 0
पिशोर,  12 वर्षांपासून एकच डाॅक्टर प्रभारी म्हणून कार्यभार सांभाळत असल्याचे ऐकून मंत्र्यांचे ओएसडी झाले आवाक...

आरोग्य मंत्र्याचे ओ.एस.डी पिशोर येथे 

 येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून बारा वर्षापासून एकच डॉक्टर प्रभारी म्हणून कार्यभार सांभाळत असल्याचे ऐकून मंत्र्यांचे ओएसडी झाले अवाक

पिशोर, दि.12(डि-24 न्यूज)- येथील ग्रामीण रुग्णालयास महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश अबीटकर यांचे ओ.एस.डी. तथा राज्याच्या आरोग्य विभागाचे नोडल अधिकारी आयुक्तालय मुंबई येथील डॉ. स्वप्निल सांगळे यांनी कन्नड तालुक्यातील आरोग्यव्यस्थेचा आढावा घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. यावेळी आमदार संजनाताई जाधव यांचीही उपस्थिती होती.

ग्रामीण रुग्णालयातील अंतर रुग्ण विभागात स्वच्छतागृह बंद असल्याने तसेच औषधी साठा ठेवण्यासाठी शीतगृह उपलब्ध नसल्याने औषधी कार्यालयातच ठेवण्यात येत असल्याने वैद्यकीय अधिकारी मुख्यालय राहत नसल्याने डॉ. सांगळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक उपस्थित नसल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. जिल्हा शल्यचिकित्सक हे दोन दिवसांची रजा टाकून सुट्टीवर गेल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्ह्याचे तालुक्याचे आरोग्य अधिकारी अशावेळी जबाबदारीने हजर राहणे गरजेचे होते.

परंतु जिल्ह्याच्या शल्य चिकित्सकानी ग्रामस्थांचा रोष टाळण्यासाठी पिशोर येथे येणे टाळले असल्याचे बोलले जात आहे.

कारण ग्रामीण रुग्णालया विषयी त्यांच्याकडे अनेकदा तक्रारी करण्यात आलेल्या आहेत.

ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. धीरज पाटील हे गेल्या बारा वर्षांपासून वर्ग - एक पदाचा प्रभारी कार्यभार सांभाळत असल्याचे पत्रकारांनी लक्षात आणून दिले असता, डॉ. सांगळे हे आवाक झाले. तर डॉ पाटील म्हणाले की माझी अजिंठा येथे बदली झाली होती पण मी येथे पुन्हा परत आलो आहे असे सांगितले त्यामुळे डॉक्टर पाटील यांना पिशोर ग्रामीण रुग्णालयात इतके स्वारस्य का आहे असा प्रश्न उपस्थितांना पडला कारण ते मुख्यालयी राहत नाही. आठवड्यातून दोन दिवस येऊन निघून जातात छत्रपती संभाजीनगर येथे ते खाजगी प्रॅक्टिस करत असल्याचे कळते. 

डॉक्टर सांगळे यांनी सांगितले की, आरोग्य मंत्री अबिटकर यांच्या आदेशाने ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी करून आरोग्य सेवा सुविधा संदर्भात असलेल्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यासाठी व आरोग्य व्यवस्थेतील समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात मंत्रालयीन स्तरावर प्रलंबित असलेल्या बाबींचा निपटारा करण्यासाठी आढावा घेऊन अहवाल आरोग्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयासाठी वैद्यकीय अधीक्षक वर्ग एक यांची नेमणूक करण्यात आली असून ते लवकरच कर्तव्यावर येतील असे त्यांनी सांगितले काही डॉक्टर्स खाजगी प्रॅक्टिस करतात त्यांच्या संदर्भात व्हिडिओ त्यांनी लिहिलेले प्रेस्क्रीप्शन्स त्यांच्या नावाचे बोर्ड आदि पुरावे जर सादर केले तर त्यांच्यावर ही अतिशय गंभीर बाब आहे एक प्रकारे शासनाची फसवणूक करण्यात येत आहे म्हणून तात्काळ कारवाई करण्यात येईल इतर आरोग्य उपकेंद्र कार्यक्षेत्रातील मृतदेहाचे शवविच्छेदन या ग्रामीण रुग्णालयात करण्यात येत नाही मृतदेह परत त्या पीएचसीला पाठवला जातो. अशी तक्रार निंभोरा गावचे माजी सरपंच गीते यांनी केली असता या ग्रामीण रुग्णालयात जो पण मृतदेह येईल त्याची उत्तरीय तपासणी यापुढे करण्याची सूचना डॉ. पाटील यांना यावेळी दिली.

मंत्र्यांचे ओएसडी येणार असल्याने ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी सर्व साग्रसंगीत तयारी केली असल्याचे दिसून आले बेडवर नवीन ब्लॅंकेट होत्या आंतर रुग्ण विभागात बेडवर कुठेही धूळ माखलेली नव्हती, स्वच्छतागृह चकचकीत झालेले होते सर्व कर्मचारी आपल्या गणवेशात हजर होते. 

आंतररुग्ण विभागातील रुग्णांना जेवण नाश्ता मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असता डॉ. सांगळे यांनी एका रुग्णाला विचारले असता जेवण नाश्ता फळ वगैरे मिळत असल्याचे सांगितले. 

मात्र पत्रकार परिषद आटोपल्यानंतर पत्रकारांनी आंतररुग्ण विभागात जाऊन पुन्हा त्याच रुग्णाला परत विचारले असता रुग्ण बबलू मोकासे यांनी सांगितले की मला हिवताप असल्याने तीन दिवसापासून ऍडमिट केलेले आहे व घरूनच जेवणाचा डबा येतो आजच सकाळी मला रुग्णालयाकडून चहा आणि एक सफरचंदाचे फळ मिळाले आहे. 

मग ओएसडी साहेबांना आपण खोटे का सांगितले असे विचारले असता संबंधित रुग्णाने संबंधित कर्मचाऱ्याचे नाव सांगितले नाही 

रुग्णाला सुद्धा खोटे बोलण्यासाठी पटवून ठेवण्यात आले होते हे यावरून निदर्शनास येते. 

अण्णा नवले यांनी सांगितले की आज पर्यंतही या ग्रामीण रुग्णालयात कोणत्याही रुग्णाला चहा नाश्ता जेवण फळ वगैरे कधीच दिले जात नाही. 

तर पांडुरंग जोशी यांनी सांगितले की रुग्णालयात 108 क्रमांकाची मोफत रुग्णवाहिकेची अत्यंत आवश्यकता आहे गरीब रुग्णांना खाजगी वाहनाने संभाजीनगर येथे जावे लागते. यासाठी त्यांना तीन हजार रुपये खर्च येतो

या प्रसंगी माजी सरपंच पी.एम. डहाके, जनार्दन मोकासे, राजू मोकासे, सूर्यकांत मोकासे, बापू मोकासे, अण्णा नवले, नारायण हरणकाळ, पांडूरंग नवले, ज्ञानेश्वर गायकवाड, कडूबा जाधव, मिलिंद लांडगे, सुनील निकम, सूर्यकांत मोकाशे, राजेंद्र मोकासे, नईम घडीवाले, तपोवनचे माजी सरपंच भगवान गीते, ज्ञानेश्वर गायकवाड, अरुण मोकासे यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

यावेळी दवाखान्याची प्रत्यक्ष स्थिती, स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांची सावरा सावर व ओ. एस. डी सांगळे यांनी पाहणी केलेले दुरावस्था याबाबीवर ग्रामस्थांमध्ये चर्चा होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow