पीक परिस्थितीचा अहवाल सादर करा - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

 0
पीक परिस्थितीचा अहवाल सादर करा - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

पीक परिस्थितीचा अहवाल सादर करा- महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश

 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज)- मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार यांनी पीक परिस्थितीची पाहणी करुन सोमवारी अहवाल सादर करावा,असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज यंत्रणेला दिले. श्री. बावनकुळे यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे आज आढावा घेतला.

विभागीय आयुक्त जी.श्रीकांत तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या आढावा बैठकीत सहभागी झाले होते.

 गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यापार्श्वभुमिवर शेतकऱ्यांची पीक पाण्याची तसेच पशुधनाच्या चाऱ्याची नेमकी स्थिती काय आहे, याबाबत वस्तूनिष्ठ माहिती येत्या दोन दिवसात सादर करावी. त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतांवर जाऊन पाहणी करावी. पीक स्थितीचा आढावा घ्यावा,असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी छत्रपती संभाजीनगर विभागाची माहिती सादर करण्यात आली की, विभागात सरासरी पर्जन्यमानाच्या 57.78 टक्के पाऊस झाला आहे.मागील वर्षी याच तारखेपर्यंत 106.38 टक्के पर्जन्यमान नोंदविण्यात आले होते. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील पर्जन्यमान याप्रमाणे- छत्रपती संभाजीनगर-82.36 टक्के, जालना-80.04 टक्के, नांदेड-74.23 टक्के, हिंगोली-70.08 टक्के, बीड-64.05 टक्के, धाराशिव-62.73 टक्के, परभणी-55.34 टक्के आणि लातूर-52.18 टक्के. विभागात एकूण 496 मंडळे असून सर्वाधिक 218 मंडळे हे मध्यम (50 ते 75 टक्के) पावसाच्या श्रेणीत आहेत. 

 विभागातील प्रकल्पांमध्ये मोठ्या 11 प्रकल्पात 66.74 टक्के जलसाठा असून मध्यम प्रकल्प 76 असून त्यात 21.34 टक्के तर लघु प्रकल्प 780 असून त्यात 20.48 टक्के जलसाठा आहे.

 विभागात सरासरी 93 टक्के क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. विभागात असलेल्या 55.66 लक्ष जनावरांसाठी 1 कोटी 07 मे.टन चारा साठा उपलब्ध आहे. पावसाचा खंड दि.23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर हा दीर्घ म्हणजेच 20 दिवसांचा खंड आहे.

 येत्या दोन दिवसांत पाहणी करुन अहवाल सादर करावा,असे निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow