दहावी परीक्षेत मनपाचे विद्यार्थी चमकले, यश दाभाडेला 95 टक्के तर बुशरा अन्सारीला 94 टक्के गुण...

महानगरपालिका शाळांचा 77% निकाल...
मुकुंदवाडी शाळेचा यश दाभाडे 95% गुण घेऊन मनपा शाळेत प्रथम...बुशरा अन्सारीला 94 टक्के गुण
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)
माध्यमिक शालांत परीक्षेत महानगर पालिकेचा एकूण 77% निकाल लागला आहे.
यात मनपा शाळेतील 7 विद्यार्थी 90% च्यावर गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
महानगरपालिकेच्या एकूण 17 माध्यमिक शाळा असून या 17 माध्यमिक शाळेतील 821 विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसले होते त्यातील 634 विद्यार्थी पास झाले असून मुकुंदवाडी शाळेचा यश दाभाडे हा विद्यार्थी 95% टक्के घेऊन महानगरपालिकेमध्ये प्रथम आला आहे व मिटमिटा शाळेची गौरी गोलवाड व नारेगाव उर्दू शाळेची बुशरा अन्सारी 94% घेऊन द्वितीय आणि किराडपुरा न 1 या शाळेचा शेख मुजाहिद 91.60% घेऊन तिसरा आला आहे. मुकुंदवाडी शाळेचा सिद्धार्थ खोले 90.60% आणि पूजा सूर्यवंशी आणि आकांक्षा तुपे हे मिटमिटा शाळेचे विद्यार्थी 90% घेऊन पास झाले आहेत.
या विद्यार्थ्यांचे व शहरातील सर्व शाळेतील पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मा.जी श्रीकांत यांनी अभिनंदन केले असून या विद्यार्थ्यांना स्वतः च्या पायावर उभा राहण्यासाठी इयत्ता दहावी वर असलेले विविध कोर्स करण्यासाठीची माहिती शाळेत उपलब्ध करून देण्याबाबत मनपा शिक्षण विभागाला सूचना दिल्या आहेत तसेच ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत किंवा नापास झाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीचीच एकमेव परीक्षा आपल्या आयुष्यात नसते अनेक परीक्षेला आपल्याला सामोरे जावे लागते त्या मुळे एका परीक्षेत अपेक्षित यश आले नाही म्हणून कोणीही खचुन न जाण्याचे आवाहन केले आहे
मनपा शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, व मुख्याध्यापक यांचे उप आयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे ,गणेश दांडगे नियंत्रण अधिकारी ,भारत तीनगोटे शिक्षण अधिकारी , रामनाथ थोरे शिक्षण विस्तार अधिकारी आणि गोविंद बाराबोटे अधीक्षक व ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
What's Your Reaction?






