मनपा आयुक्तांना फक्त भाकपाचे वावडे असल्याचा आरोप...!
 
                                मनपा आयुक्तांना फक्त भाकपचे वावडे !
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) शहरात लावलेले भारतीय कम्यूनिस्ट पक्षाचे ॲड अभय टाकसाळ यांचा फोटो व जनतेच्या ज्वलंत प्रश्नासह लावलेले बॅनर काढण्याचे आदेश मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले असल्याची माहिती मिळाली आहे. योग्य व सक्षम लोकप्रतिनिधी निवडा, भाजपा -
शिंदे - अजित पवार सरकार हटवा असे छापलेले असल्याने श्रीकांत यांनी फक्त नावडत्या भाकपचे बॅनर काढण्याचे आदेश दिल्याचा आरोप भाकपाचे एड अभय टाकसाळ यांनी केला आहे.
शहरात अनेक राजकीय पक्षांचे बॅनर लागलेले असतांना त्यातील फक्त भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ॲड अभय टाकसाळ यांचे फोटो असलेले बॅनर ज्यावर जनतेच्या ज्वलंत प्रश्नासह लावलेले बॅनर काढण्याचे आदेश मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले असल्याची माहिती मिळाली आहे . जी श्रीकांत यांनी भाकपचे बॅनर तातडीने काढण्याचे आदेश दिले व श्रीकांत यांच्या आवडत्या राजकीय पक्षाचे बॅनर्सला मनपा ने हातही लावायचा नाही असाच प्रत्यय गेल्या 10 - 12 दिवसांपासून शहराला येत आहे. भाजपा शिंदे सेने विरोधातील प्रचार रोखून श्रीकांत प्रचारात उतरलेत का..? असा ही सवाल भाकप ने केला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून असा भेदभाव अपेक्षित नाही. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
 
                        
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            