शिवसेनेचे दोन्ही हात आणि मुंडकेच कापले, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली खदखद...!
शिवसेनेचे दोन्ही हात आणि मुंडकेच कापले, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची खदखद...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) - आज विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस होता. भाजपा आणि शिंदे सेनेतील खदखद व नाराजी नाट्य समोर आले. औरंगाबाद - जालना विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपाची ताकद जास्त असल्याने सुहास शिरसाट यांना भाजपने महायुतीची उमेदवारी दिली. आज महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत सुहास शिरसाट यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु शिंदे सेनेचे आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने वाद उफाळून आला. मंत्री अतुल सावे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत जागा वाटप केले आहे. छत्रपती संभाजीनगर व जालना विधानपरिषदेसाठी भाजपाची ताकद जास्त असल्याने हि जागा भाजपला सुटली आहे. अब्दुल सत्तार हे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचे आदेश ऐकत नसतील तर त्यांचे नेते बघतील. सिल्लोडला नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी भाजपा सोबत युती केली नाही तरीही पाच जागांवर आमचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. जिल्हा परिषदेत आम्ही शिवसेनेला सत्तेत सोबत घेत होतो ते आले नाही आम्ही काय करणार. शेवटी निर्णय हा वरिष्ठ नेते घेतात तो आदेश आम्हाला पाळावा लागतो. मित्रपक्षांनी सुध्दा त्यांच्या नेत्यांचे आदेश पाळावे. अब्दुल सत्तार हे एकनाथ शिंदे यांचा अपमान करत आहे त्यांनी आपल्या मुलाचा अर्ज भरून चेक केली. भाजपचाच उमेदवार आमदार बनेल असल्याचा दावा सावेंनी केला.
माजी आमदार संजय केनेकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले अब्दुल सत्तार यांची स्वतःची पार्टी आहे. त्यांचे स्वतःचे वसूल ते वापरतात. महायुती एकजूट आहे आम्ही जिंकणार असा दावा त्यांनी केला.
माजी अब्दुल सत्तार यांनी महायुतीत सुरू असलेली खदखद आज बोलून दाखवली. जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत काय झाले. हे सर्वांना माहीत आहे. भाजपा शिवसेनेला संपवायला निघाली. अगोदर दोन हात काढून घेतले. आता तर भाजपाने विधान परिषदेची परंपरागत जागा घेऊन मुंडकेच कापले आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत अनेक वर्षांपासून स्व.बाळासाहेब ठाकरे हयात होते त्यांच्या आशिर्वादाने सत्ता होती. जिल्हा परिषदेत सत्तेत होतो. आज काय परिस्थिती आहे स्थानिक नेत्यांमुळे सर्वांना माहीत आहे. आजची औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागली आहे ती पण ताब्यात घेऊन टाका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडिच वर्षे पायात भिंगरी घालून राज्याचा दौरा करून अनेक निर्णय घेतले त्यामुळेच सत्ता पुन्हा आली. त्यांचा त्याग भाजपाने विसरु नये. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मुलाने अपक्ष फाॅर्म भरला आहे. उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. सविस्तर माहिती देऊन पुढील निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. आमदार अंबादास दानवे यांनी भाजपा शिंदे सेनेला संपवायला सुरुवात केली आहे अशी टिका केली. दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजे का...? हा प्रश्न अब्दुल सत्तार यांना विचारले असता आमचे नेते एकनाथ शिंदे दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचा निर्णय घेतील तर आम्ही त्यांचे स्वागत करु मित्रपक्षांना संपवण्याचे राजकारण कोठेतरी थांबायला पाहिजे. आमचे ममता बॅनर्जी होऊ नये यासाठी सतर्क राहावे लागेल.
What's Your Reaction?