महागाई विरोधात भाकप, माकपची तीव्र निदर्शने...!

 0
महागाई विरोधात भाकप, माकपची तीव्र निदर्शने...!

महागाई विरोधात भाकप, माकपची निदर्शने!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.(डि-24 न्यूज)- केंद्र सरकारने लादलेल्या पेट्रोल डिझेल गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा तर्फे पैठण गेट येथे जोरदार निदर्शने करण्यात आले. 

भारतीय कम्युनिस्ट पक्षा तर्फे देशभरात महागाई विरोधात आज रोजी निदर्शने करण्यात आली. याचाच एक भाग म्हणून पैठण गेट येथे झालेले निदर्शनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. इराण व रशियाकडून स्वस्तात इंधन घेतलेच पाहिजे, शेतकऱ्यांना हमीभाव दिलाच पाहिजे, उद्योगपतींना फायदा पोहचवण्यासाठी घेतलेला निर्णय मागे घ्यावा, जनतेवर महागाई लादणारे सरकार मुर्दाबाद , जगात देशाची मान खाली घालायला लावणारे सरकार मर्दाबाद, देशाला अमेरिकेचे गुलाम करणारे सरकार मुर्दाबाद , गरिबांच्या पोटावर लाथ मारणारे सरकार मुर्दाबाद, हम लढे थे गोरो से अब लड़ेंगे चोरो से, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा इत्यादी घोषणांनी पैठण गेट परिसर दणाणून गेला. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी , अँड अभय टाकसाळ, माकपचे जिल्हा सेक्रेटरी कॉ. भगवान भोजने, अँड. एस आर बोधडे, प्रा. उमाकांत राठोड, वसीम खान सिकंदर खान, कॉम्रेड अनिता हिवराळे यांची भाषणे झाली. या निदर्शनात काॅ.विकास गायकवाड, अँड. उमेश इंगळे, शेख अमजद शेख पाशु, राजू हिवराळे, रफिक बक्ष, जफर खान फजलू रहमान खान, काॅ. मनिषा भोळे, काॅ. शालुबाई कांबळे , काॅ. शिलाबाई दिवे , काॅ. सुनिता लोंढे ,रंजना भालेराव, रंजना बनसोडे, कांताबाई शेळके, रेखा नरवडे, सुनिता प्रधान, शमा बागवानसोनु शेख, शशिकांत राठोड, गजानन गायकवाड, सय्यद अजिम , कॉ. ऍड सचिन गंडले, कॉ. प्रकाश पाटील,कॉ. सुरेश वाघचौरे, कॉ. विशाल घुमरे, कॉ. राहूल धर्माधिकारी, कॉ. सतिश कुलकर्णी, कॉ. अरुण मते, कॉ. सुरज देवकर, कॉ. ऍड . रविंद्र सिरसाठ त्यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow