"माझं गांव, आरोग्य संपन्न गांवं" विभागीय कार्यशाळेचे उद्या शहरात आयोजन....

 0
"माझं गांव, आरोग्य संपन्न गांवं" विभागीय कार्यशाळेचे उद्या शहरात आयोजन....

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” विभागीय कार्यशाळेचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8 (डि-24 न्यूज): “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” या उपक्रमांतर्गत पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विभागीय कार्यशाळेचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे आज (9 एप्रिल 2026) रोजी सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे.

मंथन सभागृह, एमआयटी कॉलेज, बीड बायपास रोड, सातारा परिसर येथे होणाऱ्या या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ राहणार आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर , सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक,सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव रविंद्रन,सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, सार्वजनिक विभागाचे आयुक्त (शहरी आरोग्य) डॉ. सुनील भोकरे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, तसेच आरोग्य सेवा संचालक (प्राथमिक)डॉ. विजय कंदेवाड उपस्थित राहणार आहेत.

 ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सर्वसमावेशक व परिणामकारक करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

           या कार्यशाळेमध्ये ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा, प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना, जनजागृती कार्यक्रम तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच “माझं गांव, आरोग्य संपन्न गाव” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आवश्यक असलेल्या कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

 

             या कार्यशाळेत छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक परिमंडळातून एकूण-13 जिल्ह्याचा समावेश असून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉ.कांचन वानेरे, लातूर परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉ.रेखा गायकवाड तसेच डॉ. कपिल आहेर, याचेमार्फत करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow