महानगरपालिका राबविणार " गुणवत्तेची पंचसूत्री"

महानगरपालिका राबविणार " गुणवत्तेची पंचसूत्री "
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)
आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिका शाळेत स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा प्रकल्प राबविला जात आहे.
या प्रकल्पांतर्गत प्रथम टप्प्यात विद्यार्थ्यांची पटसंख्या व उपस्थिती वाढविण्यावर वाढविण्यावर भर देण्यात आला. पटसंख्या 5 ते 10 टक्के व उपस्थिती 10 ते 15 टक्के पर्यंत वाढली आहे. आता पुढील सत्रात महानगरपालिका विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर देणार आहे आणि त्यासाठी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून गुणवत्तेची पंचसूत्री प्रकल्प राबवला जाणार आहे .
या पंचसूत्री अंतर्गत किशोरी मेळावा, इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती, इयत्ता सातवी साठी स्पर्धा परीक्षा, बालवर्ग ते नववी साठी गुणवत्ता विकास समिती व अभ्यास गट स्थापन करणे, आणि इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले जाणार आहे ,
या पंचसूत्री अंतर्गत पहिला उपक्रम किशोरी मेळाव्यामध्ये इयत्ता सहावी ते दहावीच्या मुलींचा मेळावा आयोजित केला जाणार असून यामध्ये विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्स, शारीरिक आरोग्य ,गुड टच बॅड टच, बालविवाहाचे दुष्परिणाम बाबत माहिती दिली जाणार आहे.
इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळेत जादा तासिका सुरू करण्यात आल्या असून या विद्यार्थ्यांसाठी हिवरा पॅटर्न आश्रमचे प्रसिद्ध संचालक यांचे मार्गदर्शन शिक्षकांना देण्यात आले आहे व विद्यार्थ्यांसाठी मनपा स्तरावरून सराव परीक्षेचे सुद्धा नियोजन करण्यात आले आहे.
पंचसूत्री मधील तिसरा उपक्रम नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले असून या मध्ये इयत्ता सातवी मधील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा आयोजित केलेली आहे.
यामध्ये पुढे इयत्ता आठवी ला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आत्ताच तयारी झाली पाहिजे हा उद्देश समोर ठेवून यामध्ये सामान्य ज्ञानाचे 250 प्रश्न विज्ञान चे 200 प्रश्न अंकगणित व बुद्धिमत्तेचे 100 प्रश्न आणि इंग्रजीचे 50 प्रश्न असे 600 प्रश्नांची (question set )प्रश्न पत्रिका संच शाळांना पुरवठा करण्यात येणार असून एक जानेवारीपासून प्रत्येक दिवशी दहा प्रश्न विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत असे दोन महिने विद्यार्थ्यां कडून या प्रश्न प्रश्नाची तयारी करून घेतली जाणार आहे.याची मनपाच्या 50 शाळेत शाळा स्तरावर 1200 विद्यार्थ्यांची पूर्व चाचणी परीक्षा घेतली जाणार असून यामधून टॉप टेन विद्यार्थी निवडले जातील व या टॉप टेन 500 विद्यार्थ्यांची परीक्षा महानगरपालिका स्तरावर घेतली जाणार आहे व यामधून टॉप टेन विद्यार्थी निवडले जाणार आहेत व त्या टॉप टेन विद्यार्थ्यांना बंगलोर येथे इस्रो या संस्थेला भेट देण्यासाठी घेऊन जाणार आहेत.
पंचसूत्री मधील चौथा उपक्रम अंतर्गत बालवाडीच्या बालताई साठी आनंदी बाल शिक्षण प्रकल्पाचे प्रशिक्षण, इयत्ता पहिली व दुसरी साठी अध्ययन स्तर निश्चिती दोन टप्प्यात केली जाणार आहे व इयत्ता 3 ते 9 साठी अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय आयुक्त यांनी घेतला आहे.
पंचसूत्री मधील पाचवा उपक्रम इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा 100% निकाल लागावा हा उद्देश समोर ठेवून या विद्यार्थ्यांना नामांकित क्लासेसचे संचालक, बोर्ड परीक्षेचे पेपर तपासणारे तज्ञ शिक्षक , समुपदेशक यांचे मार्गदर्शन शिबिर दोन टप्प्यांमध्ये विद्यार्थी आणि पालकांसाठी आयोजित केले जाणार आहे.
अशा पद्धतीने बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची पंचसूत्री हा प्रकल्प आयुक्त यांच्या संकल्प मधून राबवला जाणार आहे.
यासाठी सर्व मुख्याध्यापकांची बैठक मनपा मुख्यालय येथे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी घेतली व या संदर्भात आवश्यक त्या सूचना सर्व मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना देण्यात आल्या आहेत.
या बैठकीस उप आयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे ,उप आयुक्त अपर्णा थेटे, शिक्षण नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे ,शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे, शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ थोरे, व गोविंद बाराबोटे अधीक्षक शिक्षण विभाग यांच्यासह सर्व केंद्रीय मुख्याध्यापक व मुख्याध्यापक उपस्थित होते.
या बैठकीमध्ये स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल अंतर्गत गुणवत्तेची पंचसूत्री प्रकल्पाचे सादरीकरण ज्ञानदेव सांगळे सहायक कार्यक्रम अधिकारी यांनी केले .
What's Your Reaction?






