शिवसेनेच्या वतीने बुधवारी सायंकाळी तिरंगा यात्रा

 0
शिवसेनेच्या वतीने बुधवारी सायंकाळी तिरंगा यात्रा

शिवसेनेच्या वतीने बुधवारी सायंकाळी तिरंगा यात्रेचे आयोजन 

देशभक्त नागरिकांनी उपस्थित राहावे - किशनचंद तनवाणी 

छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.12(डि-24 न्यूज) : हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यादरम्यान गेल्या 9 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भव्य तिरंगा यात्रा काढून जल्लोष साजरा केला जातो. यावेळी देशभक्त नागरिकांननी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी केले.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बुधवारी 14 रोजी, सायंकाळी 6 ते 10 या वेळेत, क्रांतीचौक येथुन तिरंगा यात्रेची सुरुवात होवुन पैठणगेट मार्गे, गुलमंडी, सुपारी हनुमान रोड, सिटीचौक, सराफा रोड मार्गे गांधी पुतळा येथुन संस्थान गणपती मंदिर, राजाबाजार येथे तिरंगा यात्रेची समारोप होणार असुन भारतमातेचे पुजन व स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow