दरवर्षीप्रमाणे मुस्लिम बांधवांनी केली आंबेडकरी जनतेची सेवा

 0
दरवर्षीप्रमाणे मुस्लिम बांधवांनी केली आंबेडकरी जनतेची सेवा

दरवर्षीप्रमाणे मुस्लिम बांधवांनी केली आंबेडकरी जनतेची सेवा

औरंगाबाद, दि.15(प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे 14 जानेवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त परिसरातील मुस्लिम बांधवांनी आंबेडकरी जनतेची सेवा करत कार्यक्रमात सहभाग घेतला. सकाळपासूनच उशिरा रात्रीपर्यंत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी गर्दी झाली होती. याप्रसंगी भोजनदान, पाणी व नास्त्याची सुविधा करण्यात आली होती. समाजसेवक मोहम्मद हिशाम उस्मानी व भिमसैनिकांनी व्हेज पुलाव वाटप केले. रात्री उशिरापर्यंत भोजनदान करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती विजय पट्टेकर, राजु आमराव, भुषण रत्नपारखी, भीमसेन पट्टेकर, सचिन वाहुळकर, फैजान सय्यद व मुस्लिम बांधवांनी परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow