14 गोवंशाची सुटका, 4 वाहने जप्त, 9.85 लाखांचा मुद्देमाल हस्तगत...!

 0
14 गोवंशाची सुटका, 4 वाहने जप्त, 9.85 लाखांचा मुद्देमाल हस्तगत...!

गोवंश जनावरांच्या क्रूर वाहतुकीविरोधात ग्रामीण पोलिसांची प्रभावी कारवाई... वैजापूर व पैठण येथे दोन स्वतंत्र कारवायांमध्ये 14 गोवंश जनावरांची सुटका; 4 वाहने जप्त, सुमारे 9.85 लाखांचा मुद्देमाल हस्तगत...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज)-गोवंश जनावरांची अवैध व क्रूर पद्धतीने वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाकडून सातत्याने प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने दि. 15 जुलै 2026 रोजी वेजापूर व पैठण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण 14 जर्सी गोवंश जनावरे, 4 मालवाहू वाहने असा सुमारे 9,85,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार आरोपींविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वैजापूर पोलीस ठाण्याची कारवाई...

दि. 15 जुलै 2026 रोजीडायल-112 प्रणालीवर कर्तव्य बजावत असताना दुपारी 2.36 वाजण्याच्या सुमारास वेजापूर-शिऊर रोडवरील एम.आय.टी. कॉलेज, रोटेगाव रेल्वे पुलाजवळ गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली.

माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन संशयित वाहनांची तपासणी केली. त्यावेळी जनावरे दाटीवाटीने कोंबून, आखूड दोऱ्यांनी बांधून तसेच चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता अत्यंत अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.

या कारवाईत खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आले—

सुनील मनोहर मघरे (रा. टाकळी, ता. सिल्लोड)

जुबेर फरीद कुरेशी (रा. पिशोर, ता. कन्नड)

आसिफ भिकन शहा (रा. पिशोर, ता. कन्नड)

त्यांच्याकडून खालील वाहने जप्त करण्यात आली आहेत...

बोलेरो पिकअप MH-20-EG-1624

अशोक लेलँड पिकअप MH-04-FU-9307

बोलेरो पिकअप MH-04-KF-3905

अशी 03 वाहने, तसेच 07 जनावरे व 03 वासरे जप्त करण्यात आली. या कारवाईत 6,40,000/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम, 1960 चे कलम 11 अन्वये वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैठण पोलीस ठाण्याची कारवाई...

याच दिवशी सायंकाळी 7.50 वाजण्याच्या सुमारास पैठण तालुक्यातील जायकवाडी फाटा येथे पैठण पोलीसांनी संशयित मालवाहू वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये दोन गोवंश जनावरे अत्यंत क्रूर पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.

तपासणीदरम्यान जनावरांना चारापाण्याची व्यवस्था न करता, आखूड दोऱ्यांनी बांधून, वेदना व पीडा होतील अशा पद्धतीने वाहनातून कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी शफीक रफीक शेख (वय 36 वर्षे, रा. रांजणगाव दांडगा, ता. पैठण) यास ताब्यात घेण्यात आले.

त्याच्याकडून 02 गोवंश जनावरे आणि वाहन 

टाटा छोटा हत्ती (MH-20-EG-1638)

असा 3,45,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी प्राणी संरक्षण अधिनियम, 1976 चे कलम 5(अ), 5(ब) तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम, 1960 चे कलम 11(1)(एफ) व 11(1)(एच) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकत्रित कारवाईचा तपशील...

या दोन्ही कारवायांमध्ये ग्रामीण पोलिसांनी—

 04 आरोपींवर गुन्हे दाखल 14 गोवंश जनावरे (11 गायी, व 3 वासरे व) सुरक्षित जप्त 04 मालवाहू वाहने जप्त एकूण 09,85,000/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत

करून गोवंश जनावरांच्या अवैध वाहतुकीविरुद्ध प्रभावी कारवाई केली आहे.

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीसांकडून गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक, प्राण्यांवरील क्रूरता तसेच कत्तलीसाठी होणारी अवैध ने-आण रोखण्यासाठी यापुढेही सातत्याने विशेष कारवाया राबविण्यात येणार असून अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow