आरसीसी कोचिंग क्लासेसवर एमआयएमचा हल्ला, मोटेगावकरच्या पोस्टरला काळे फासले...!
आरसीसी कोचिंग क्लासेसवर एमआयएमचा हल्ला, मोटेगावकर यांच्या पोस्टरला काळे फासले
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) - नीट पेपर लिक प्रकरणात सिबिआयने मोठे मासे पकडण्यासाठी फास आवळला आहे. पुण्यातून हे पेपर लिकचे केंद्र असल्याचे तपासात समोर आले आहे. तेथे दोन जणांना अटक झाली आहे. तर कडक तपासणी झाल्यानंतर लातूरहून आर सी सी कोचिंग क्लासेस संचालक शिवराज मोटेगावकर यांना अटक झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये आर सी सी कोचिंग क्लासेसच्या शाखा आहेत. लाखो रुपये खर्च करून विद्यार्थी येथे शिक्षण घेतात आणि तेथील जवाबदार प्राध्यापक असलेले मोटेगावकर यांना अटक होत असेल तर पालकांनी कोणावर विश्वास ठेवायचा. एमआयएम विद्यार्थी आघाडी अक्रामक झाली आहे. लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय करणा-या दोषी आरोपिंना कडक शिक्षा द्यावी अशी मागणी करत विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक डॉ.कुणाल खरात यांनी कोकणवाडी येथील आर सी सी कोचिंग क्लासेससवर हल्ला करत मोटेगावकर यांच्या पोस्टरला काळे फासले. यानंतर क्लासेस विरोधात घोषणाबाजी केली. यानंतर प्रतिक्रिया देताना डॉ. कुणाल खरात यांनी पालकांना आवाहन केले तुम्हीही विरोध करा आम्ही कोचिंग क्लासेसच्या पोस्टरला काळे फासून निषेध केला. लाखो रुपये खर्च करून विद्यार्थी येथे शिक्षण घेतात आणि हेच लोक गैरप्रकार करुन विद्यार्थी घडवत असतील तर त्या डॉक्टरांचा दर्जा कसा असेल. शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या अशा कोचिंग क्लासेसच्या संचालकांना कठोर शिक्षा द्यावी यानंतर पेपर लिक होणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. काळे फासणा-या कार्यकर्त्यांना वेदांत नगर पोलिसांनी ताब्यात घेतले.
What's Your Reaction?