औरंगाबाद - जालना विधानपरिषद निवडणूक, आदर्श आचारसंहिता लागू...!

 0
औरंगाबाद - जालना विधानपरिषद निवडणूक, आदर्श आचारसंहिता लागू...!

औरंगाबाद - जालना विधानपरिषद निवडणूक 18 जूनला, आचारसंहिता लागू...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) - निवडणूक आयोगाने राज्यातील 16 विधानपरिषद निवडणूक - 2026 कार्यक्रम आज घोषित केला आहे. यामध्ये औरंगाबाद - जालना विधानपरिषद जागेचाही समावेश आहे. विधानपरिषद सदस्य अंबादास दानवे हे मागिल निवडणुकीत या जागेवर निवडून गेले होते. मुदत संपल्यानंतर निवडणूक आयोगाने आज निवडणुकीच्या तारीख घोषित केली असल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर यांनी प्रसिध्दीपत्रकात आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आदेश काढले आहेत.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद - जालना स्थानिक प्राधिकारी विधानपरिषद द्वीवार्षिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तर निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे प्रभाविपणे अंमलबजावणी करण्यात यावी. मा.भारत निवडणूक आयोगाने क्रं.3 अन्वये दिलेल्या आचारसंहिता संदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. आपल्या कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहितेचे भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.

औरंगाबाद - जालना विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम...

नोटीफिकेशन निघणार - 25 मे 2026

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिनांक - 1 जून-2026

उमेदवारी अर्ज छाननी - 2 जून 2026

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख - 4 जून 2026

मतदान दिनांक - 18 जून 2026

वेळ - सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत 

मतमोजणी - 22 जून 2026

मतदान प्रक्रिया संपण्याची तारीख - 25 जून 2026

महाराष्ट्रातील या रिक्त 16 विधानपरिषद सदस्य जागेवर होणार आहे मतदान...

औरंगाबाद - जालना, परभणी-हिंगोली, उस्मानाबाद - लातूर - बीड, नांदेड, अमरावती, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बुलढाणा - गोंदीया, पुणे, यवतमाळ, सांगली - सातारा, जळगांव, ठाणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूरचा समावेश आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow