मेरी संस्थेचा अहवाल मराठवाड्यावर अन्याय करणारा - विरोधीपक्षनेते अंबादास दानवे

मेरी संस्थेचा अहवाल मराठवाड्यावर अन्याय करणारा...
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची परिषद सभागृहात खंत...
मुंबई, दि.7(डि-24 न्यूज) मेरी संस्थेने मराठवाड्याला ६५ ऐवजी ५८ टक्के पाणी देण्याचा अहवाल दिला होता, तो मराठवाड्यावर अन्याय करणारा असल्याची खंत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात व्यक्त केली. समन्यायी पाणी वाटपाच्या धोरणानुसार सदरील अहवाल अन्यायकारक असल्याचे ते यावेळी म्हणाले..
मेरी संस्थेने दिलेल्या अहवालामुळे मराठवाड्याचे पाणी कमी होईल, अशी भीती येथील जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. समन्यायी पाणी वाटपाच्या धोरणाला वगळून जर जायकवाडी धरणावर अन्याय करण्याचं प्रयत्न होत असेल तर या अन्यायकारी धोरणाविरोधात मराठवाडा पेटुन उठेल, अशी भावना दानवे यांनी व्यक्त केली. तसेच कायदेशीर पदावर असलेल्या राज्याच्या मंत्र्यांनी एका विभागाची भूमिका न घेता जबाबदार व्यक्ती म्हणून सर्व राज्याला लाभदायक भूमिका घ्यावी, असे आवाहन दानवे यांनी उत्तर महाराष्ट्रातील मंत्री व आमदारांना केले.
राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या साखर कारखान्याने समन्यायी पाणी वाटपाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, अशी माहिती अंबादास दानवे यांनी सभागृहात दिली.
What's Your Reaction?






