आदर्शच्या ठेविदारांना मिळणार 40 हजार रुपये, मागवली माहिती
आदर्शच्या ठेविदारांना मिळणार 40 हजार रुपये...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) आदर्श नागरी सहकारी पतसंस्था औरंगाबाद मर्या या संस्थेच्या 40,000 पर्यंतच्या ठेवी परत करण्यात येणार आहे. याकरिता ज्या ठेविदारांचे पतसंस्थेतील सर्व प्रकारच्या मुदत ठेवी, बचत खाते व पिग्मी खात्यातील एकूण ठेव रक्कम 40 हजार पर्यंत आहे. अशा सर्व खातेदारांनी पतसंस्थेचे मुख्य कार्यालय प्लाॅट नं.31, शिवज्योती काॅलनी, जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय समोर, एन-6, सिडको, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथे मुळ ठेव पावती, दोन पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, इतर बँकेतील बचत खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत इत्यादी कागदपत्रे लवकरात लवकर जमा करावीत असे प्रशासक समितीने केली आहे.
तसेच जे ठेविदार रुग्णालयात अॅडमिट आहेत व जे ठेविदार 70 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले आहेत अशा ठेविदारांनी आवश्यक पुराव्यासह संस्थेकडे अर्ज केल्यास त्यांच्या पतसंस्थेकडे ठेवीपैकी 10 हजार देणे बाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही प्रशासक समितीने कळवले आहे.
What's Your Reaction?