महापालिकेचा आरोग्य उपक्रम यशस्वी, 251 महीलांना लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे दिलासा...
“महानगरपालिकेचा आरोग्य उपक्रम यशस्वी: 251 महिलांना लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे दिलासा”
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)- महानगरपालिकेचे महापौर श्री. समीर राजूरकर, उपमहापौर श्री. राजेंद्र जंजाळ तसेच आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्या आदेशानुसार व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या वतीने दि. 30/04/2026 रोजी सिडको N-11 मनपा रुग्णालय येथे लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये 12 महिलांवर यशस्वीपणे मोफत लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आत्तापर्यंत महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये आयोजित मोफत लॅप्रोस्कोपिक शिबिरांच्या माध्यमातून एकूण 251 महिलांवर शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत.
यावेळी डॉ. शिरसाट, डॉ. दवंडे, डॉ. नरवणे, डॉ.बजाज, डॉ. कल्पना राठोड, नर्सिंग स्टाफ नंदा जाधव, कमल खंडागळे, सुनंदा साठे, कल्पना म्हस्के, शुभांगी भोपळे तसेच सिडको N-11 रुग्णालयातील सर्व कर्मचारी यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
मोफत लॅप्रोस्कोपिक (दुर्बिणीद्वारे) कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया या आधुनिक, सुरक्षित व अल्पकालीन विश्रांतीची आवश्यकता असलेल्या पद्धती असून महिलांसाठी वेदनामुक्त व जलद आरोग्यलाभ देणाऱ्या ठरत आहेत. या शस्त्रक्रियांमुळे महिलांच्या आरोग्याबरोबरच कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक स्थैर्यालाही बळकटी मिळत आहे.
यापुढेही मनपाच्या सहा रुग्णालयांमधून (सिडको एन-8, सिडको एन-11, सिल्क मिल कॉलनी, कैसर कॉलनी, नेहरूनगर, मेल्ट्रॉन रुग्णालय) नियमितपणे लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्या
त येत आहे.
What's Your Reaction?