बेकायदेशीर तलवारीसह युवकाला केली अटक...
बेकायदेशीर तलवारीसह युवक ताब्यात; बिडकीन पोलिसांची कारवाई
छत्रपती संभाजीनगर, दि. 23 (डि-24 न्यूज) – बिडकीन पोलिसांनी बेकायदेशीररीत्या धारदार तलवार बाळगणाऱ्या एका युवकाविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जुलै 2026 रोजी दुपारी 3.05 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपी अरबाज अखिल सय्यद (रा. पैठण, हल्ली मुक्काम गिधाडा, ता. पैठण) याच्याकडे कोणताही वैध परवाना नसताना धारदार तलवार आढळून आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल पवन नारायण चव्हाण (वय 38) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 474/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियमाचे कलम 4, 25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कदम हे करीत असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) शेख यांनी केली.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी शरद पवार, पवन चव्हाण, दिनेश चव्हाण तसेच चालक सचिन म्हस्के यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
What's Your Reaction?