किराडपुरा येथे रेशनचा 17 लाखांचे अन्नधान्य व मुद्देमाल जप्त, 5 जणांवर दोन गुन्हे दाखल...

 0
किराडपुरा येथे रेशनचा 17 लाखांचे अन्नधान्य व मुद्देमाल जप्त, 5 जणांवर दोन गुन्हे दाखल...

जिन्सी भागात जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हे शाखेची मोठी कारवाई; रेशनचा माल व अंगणवाडी पोषण आहार 17 लाखांचा मुद्देमाल जप्त...

छत्रपती संभाजीनगर, दि. 14(डि-24 न्यूज) – शहरातील जिन्सी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शाखेने जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत मोठी कारवाई करत रेशनिंगचा माल, वाहन तसेच अंगणवाडीसाठी असलेला पोषण आहार जप्त केला. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण 17 लाख 06 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेला 12 जून 2026 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली की, किराडपुरा येथील रहमानीय कॉलनी परिसरातील एमआर फंक्शन हॉलजवळील गोदामामध्ये रेशन धान्याचा साठा करून तो काळ्या बाजारात विक्रीसाठी वाहनात भरला जात आहे. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हा सहाय्यक पुरवठा अधिकाऱ्यांसह छापा टाकला.

या कारवाईत गुन्हा क्र. 181/2026 अंतर्गत कलम 3, 7 जीवनावश्यक वस्तू अधिनियम, कलम 4, 27 पेट्रोलियम कायदा 1934 तसेच कलम 287 भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी अटक आरोपी म्हणून

समीर बाबर कुरेशी, रा. चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर

फहाद लईक शुत्तारी, रा. किराडपुरा, छत्रपती संभाजीनगर

फरदीन गणी पठाण, रा. चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर

यांना अटक करण्यात आली आहे.

तसेच फरार आरोपी म्हणून

आवेज कुरेशी, रा. चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर

कलीम छोटे कुरेशी व त्याचे इतर साथीदार

यांचा शोध सुरू आहे.

या कारवाईदरम्यान अंदाजे 15 लाख 75 हजार 300 रुपयांचा रेशनिंग माल व वाहन जप्त करण्यात आले.

त्यानंतर महिला व बालविकास विभागांतर्गत अंगणवाडीतील 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालके व गर्भवती/स्तनदा मातांसाठी शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पॅकेटमधील खाद्यपदार्थ गोदामामध्ये सापडल्याने, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्र. 182/2026 दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात कलम 3, 7 जीवनावश्यक वस्तू अधिनियम तसेच कलम 318, 3(5) भा.दं.वि. अंतर्गत कारवाई करण्यात आली. या प्रकरणात 1 लाख 31 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या दोन्ही कारवायांमध्ये फिर्यादी म्हणून

संतोष विश्वनाथ शिंदे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर

तसेच गणेश पुंडले, बालविकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर

यांनी तक्रार दिली आहे.

कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची नावे :

ही कारवाई गजानन कल्याणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलीस निरीक्षक पांडे, पोलीस अंमलदार पाथरकर, प्रभंजन, दिनेश बन, पोहेकॉ. संदीप तावडे, प्रदीप देवकते, योगेश नसराते, विजय निकम, विनोद परदेशी, राहुल बंगाळे, जालिंदर गोरें, विशेष पथकाचे पोहेकॉ. अरुण भिसे, दिनकर आवारे, अभिषेक बांदे, सागर गोंडे, माया माठी, मनीषा नरवडे यांचा सहभाग होता. तसेच जिल्हा सहाय्यक पुरवठा अधिकारी संदीप शिंदे आणि महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश पुंडले यांनीही सहकार्य केले.

सदर कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) शर्मिला घरटे-वाळवळकर, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow