गावठी कट्टा बाळगुन दहशत माजविणा-या इसमास केले जेरबंद...

 0
गावठी कट्टा बाळगुन दहशत माजविणा-या इसमास केले जेरबंद...

गावठी कट्टा बाळगुन दहशत माजविणा-या इसमास केले जेरबंद...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) -

गणेशोत्सव दरम्यान शांतता राहावी काही अनुचित प्रकार घडणार नाही याकरीता रेकाॅर्डवरील गुन्हेगार तपासणीचे आदेश पोलिस अधिक्षक डाॅ.विनयकुमार राठोड यांनी दिले आहे. गंगापुर हद्दीत नवीन कायगाव भागात गुन्हेगार यांचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेंडाळा ते गंगापुर रोडने एक इसम गावठी कट्टा घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांना माहिती मिळाली असता संशयीत नामें महेश मारुती जाधव, वय 27, राहणार दहेगाव बंगला, ता.गंगापुर, हा मोटारसायकलवर येताच शिताफिने पकडून अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात एक गावठी कट्टा ज्याची किंमत 30 हजार रुपये व एक मोटारसायकल किंमत 40,000 असा एकूण 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित आरोपींविरोधात गंगापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदरील कार्यवाई पोलिस अधिक्षक डाॅ.विनयकुमार राठोड, अपर पोलिस अधिक्षक श्रीमती अन्नपुर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांचे नियोजनात सपोनि पवन इंगळे, पोह वाल्मिक निकम, शिवानंद बनगे, अशोक वाघ, पोअं महेश बिरुटे, अनिल काळे, संजय तांदळे यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow