सत्ताधारी भाजपचे 6 झोनमध्ये सभापती तर एमआयएमच्या गडात वंचितचा सभापती...!
भाजपाला 6, शिवसेनेला एक, वंचित एक, एमआयएमला एक प्रभाग समिती सभापती पद
एमआयएमच्या गडात वंचितचा प्रभाग समिती सभापती, उबाठाने दिली साथ...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) - महापालिकेच्या 9 प्रभाग समिती सभापती निवडणुकीत 5 बिनविरोध तर 4 प्रभाग समिती सभापतीसाठी आज जिल्हाधिकारी विनय गौडा जे.सी.यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. यावेळी सचिव नंदकिशोर भोंबे उपस्थित होते.
या निवडणुकीत भाजपाचे चार झोन 2 वाडेकर राजू जगन्नाथ, झोन 6 प्रियांका दिपक खोतकर, झोन 7 अनिता किशोर मानकापे, झोन 8/10 कुलकर्णी सविता रत्नाकर तर एमआयएचे झोन क्रमांक 3 मधून सय्यद सोहेल सय्यद महेमूद हसन हे बिनविरोध निवडून आले आहे.
आज झालेल्या अटीतटीच्या लढतीत झोन क्रमांक 1 मधून वंचित बहुजन आघाडीच्या करुना मेघानंद जाधव विजय झाल्या. त्यांना 7 मते पडली तर एमआयएचे अली मीर वाजीद यांना 4 मते पडली. एमआयएमच्या गडात उबाठाच्या साथीने वंचितचा विजय. झोन क्रमांक 4, भाजपाचे हिवराळे जीवकपाल भिमराव यांनी 7 मते घेत विजयी झाले. एमआयएमचे अजहर पठाण यांना 4 मतांवर समाधान मानावे लागले. झोन क्रमांक 5 मध्ये भाजपचे खरात मीना नितिन यांनी 12 मते घेत एमआयएमच्या सादीया अमजद खान यांचा पराभव केला त्यांना चार मते पडली. झोन क्रमांक 9 मध्ये शिवसेनेच्या छाया विनय वाघचौरे यांनी 7 मते घेत विजयी झाले. एमआयएमच्या सुनिता मनोज वाहुळे यांना चार मतांवर समाधान मानावे लागले. प्रभाग समिती सभापती निवडणुकीत सत्ताधारी भाजपाचा दबदबा दिसून आला. याप्रसंगी मंत्री अतुल सावे, शहराध्यक्ष किशोर शितोळे, महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन करत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करतील असा विश्वास व्यक्त केला
.
What's Your Reaction?