मोहम्मद हमजाची राज्यस्तरीय वूशू स्पर्धेसाठी निवड, पटकावला सुवर्णपदक

 0
मोहम्मद हमजाची राज्यस्तरीय वूशू स्पर्धेसाठी निवड, पटकावला सुवर्णपदक

मोहम्मद हमजा अझर शेखची राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय स्पर्धेत 36 किलो वजन गटात सुवर्णपदक; पुण्यात होणार राज्यस्तरीय स्पर्धा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28 (डि-24 न्यूज) :- जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावणाऱ्या एसएफएस इंग्लिश स्कूलच्या इयत्ता नववीतील खेळाडू मोहम्मद हमजा अझर शेख याची आता राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुणे येथे ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

टीव्ही सेंटर रोडवरील राणा मंगल कार्यालय येथे नुकतीच पहिली छत्रपती संभाजीनगर सब-ज्युनिअर/ज्युनिअर वुशू स्पर्धा पार पडली. आमदार सुहास शिरसाठ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत मोहम्मद हमजा याने 36 किलो वजन गटात उत्कृष्ट तंत्र, कौशल्य आणि खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे अध्यक्ष मुख्तार पटेल आणि सचिव सय्यद सद्दाम यांच्या हस्ते हमजाला सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यानंतर हमजाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने क्रीडा क्षेत्रातून त्याचे कौतुक होत आहे. त्याला क्रीडा शिक्षक सय्यद जुबेर सर आणि अब्दुल हादी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

हमजाच्या या यशाबद्दल व राज्यस्तरीय स्पर्धेतील निवडीबद्दल माजी नगरसेवक इर्शाद हाजी, नासेर सिद्दीकी, शेख सलमान पैलवान, जहूर सय्यद, अजिंक्य नितनवारे, जाहिद खान, अब्दुल मजीद, सय्यद रिजवान, सय्यद अबुलाला, तसेच शाळा प्रशासन, शिक्षक, कुटुंबीय आणि क्रीडाप्रेमींनी त्याचे अभिनंदन केले आहे. पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेतही दमदार कामगिरी करून विजेतेपद मिळवावे, यासाठी हमजाला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow