नशेच्या औषधी गोळ्यांसह तरुण ताब्यात...!

 0
नशेच्या औषधी गोळ्यांसह तरुण ताब्यात...!

210 नशेच्या औषधी गोळ्यांसह तरुण ताब्यात...

अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाची औरंगपुरा येथे कारवाई; 51 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28 (डि-24 न्यूज) :- शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदानाच्या गेटजवळ कारवाई करत 210 नशेच्या औषधी गोळ्या आणि एक मोबाईल असा एकूण 51 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एका 20 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

दि. 27 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 8 वाजता गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाईदरम्यान राहिल शेख महेमुद शेख (वय 20, रा. हुसेन कॉलनी, पुंडलिकनगर, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून नशेच्या 210 औषधी गोळ्या आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदर गोळ्या जुबेर ऊर्फ जुनेद समशेर पठाण (रा. हुसेन कॉलनी, सानिया शाळेजवळ, न्यायनगर, पुंडलिकनगर) याच्याकडून आणल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी राहिल शेख आणि जुबेर ऊर्फ जुनेद पठाण या दोघांविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद आणि पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

दरम्यान, शहरात कुठेही अंमली पदार्थांची विक्री, सेवन किंवा नशेसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्ती अथवा टोळ्यांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांना 9684702002 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे माहिती देता येणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow