2024 च्या निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव होईल...शरद पवारांचा दावा

 0
2024 च्या निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव होईल...शरद पवारांचा दावा

2024 च्या निवडणुकी नंतर मोदी सरकार राहणार नाही- शरद पवार

भाजपाशी कोणत्याही परिस्थितीत समझोता नाहीच...

अजित पवार यांची भेट कौटुंबिक, राजकीय नाही...

औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेली भेट कौटुंबिक होती राजकीय नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नाही. त्या बातम्या संभ्रम निर्माण करण्यासाठी पेरले गेले असे शरद पवारांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीत सर्व चांगले चालले आहे. I.N.D.I.A ची मुंबईत बैठक होणार आहे यामध्ये लोकसभा निवडणुकीबाबत रननिती ठरवली जाईल. भाजपासोबत माझा कोणत्याही परिस्थितीत समझौता नाही. 2024 साली होणा-या लोकसभा निवडणुकीत एनडीएला हरवणे व मोदी सरकार हटवणे एकच लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी देशात जनमत बनत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी स्पष्ट केले. कारण आता जनता कंटाळली असे सरकारच्या वागण्यावरून दिसत आहे.

त्यांनी आरोप केला दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. औरंगाबाद नामांतर बाबत न्यायालयात प्रकरण आहे असे बोलून औरंगाबाद आणि संभाजीनगर बोलायला पवार विसरले नाही. अगोदरच्या दौ-यात त्यांनी औरगाबादच बोलणार असा उल्लेख केला होता पण आज ते दोनीही बोलले.

विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री पवार हे गेल्या दोन दिवसापासून मराठवाडा दौऱ्यावर आहे उद्या गुरुवारी त्यांची बीड येथे जाहीर सभा होणार आहे त्यापूर्वी त्यांनी आज बुधवारी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार पुढे म्हणाले इतर पक्षात फुट पाडून लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार केंद्रातील सरकार हे पाडण्याचे काम गेली काही वर्षात भाजपाने केले आहे. अनेक राज्यांत भाजपाची सत्ता नसताना ईडी सीबीआय यासारखे संस्थांचा धाक दाखवून इतर राज्यातील सरकार पाडून आपले सरकार येथे स्थापन करणे हाच उद्देश ठेवून भाजप सरकार काम करीत आहे हे सर्व देशातील जनता बघत आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र या राज्यातील सरकार पाडण्याचे काम त्यांनी केले. जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. मणिपूर घटनेने देश हादरुन गेले तरीही मोदींनी लाल किल्ल्यावरून झालेल्या भाषणात काही ठोस सांगितले नाही मणिपूरच्या घटनेवर फक्त दोन मिनिटे बोलले बाकी इतर विषयावर ते पाहुणे दोन तास बोलले 2024 मध्ये मी पुन्हा येईल असे ते म्हणतात. फडणवीस यांच्यासारखे "मी पुन्हा येईल" असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले फडणवीस यांचा आदर्श मोदी यांनी घेतला असल्याचा टोला ही श्री पवार यांनी लगावला पण तशी परिस्थिती सध्या नाही. विरोधकांना केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून कार्यवाही करुन संपवण्याचे काम मोदी सरकार करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला

संजय राऊत यांनी केलेल्या टिकेवर त्यांनी सांगितले आता संभ्रम दूर झाला आहे. महाविकास आघाडी भक्कम आहे. माजीमंत्री नवाब मलिक यांच्यावर अन्याय झाला असल्याचे पवार म्हणाले. सध्या त्यांच्या प्रकृतीचा प्रश्न आहे. तब्येत बरी झाल्यावर ते निर्णय घेतील कुणासोबत जायचे. 14 ऑगस्टला देशाची फाळणी झाली होती तो दिवस साजरा करायचा आणि लोकांसमोर फाळणिचा इतिहास दाखवायचा असे परिपत्रक सरकारने शाळांसाठी काढले हे देशासाठी दुर्देव आहे. यामुळे दोन समाजात दुही निर्माण होण्याची भीती आहे .हा प्रश्न आगामी इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल. असे पवार म्हणाले. एका प्रश्नावर बोलताना श्री पवार म्हणाले 1980 साली माझ्या पक्षाचे 46 आमदार निवडून आले होते पाच आमदार वगळता सगळे सोडून गेले बाहेर गेलेल्यापैकी दोन-तीन सोडले तर सोडून गेलेले आमदार पुन्हा विधानसभेत दिसले नाही या वेळची परिस्थिती अत्यंत वाईट आहे लोकांनी आता मत तयार केले आहे त्यामुळे 2024 च्या निवडणुकीमध्ये मोदी सरकार दिसणार नाही असा दावाही शरद पवार यांनी केला.

यावेळी माजीमंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार, जयसिंगराव गायकवाड, प्रवक्ते महेश तपासे, प्रदेश सचिव मुश्ताक अहमद, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, सुधाकर सोनवणे आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow