शहरात एनएसयुआयचा March For Democracy विराट मोर्चा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात एनएसयुआयचा विराट मोर्चा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 30 (डी-24 न्यूज) : मतचोरी, एसआयआर आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यांवर आवाज उठवत एनएसयूआयच्या वतीने ‘March for Democracy’ या विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले. एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले.
शहागंज येथील काँग्रेस कार्यालय गांधी भवन येथून दुपारी 12 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. शहागंज, चेलीपुरा, फाजलपुरा मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मोर्चा अडवला. यावेळी आंदोलक कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले.
‘लोकशाहीचे रक्षण करा’, ‘मताधिकाराचे रक्षण करा’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी आपला आवाज बुलंद केला.
या मोर्चात एनएसयूआयचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर सालुंके, उपाध्यक्ष डॉ. शादाब अब्दुल रहेमान शेख, जिल्हाध्यक्ष अभिषेक शिंदे यांच्यासह एनएसयूआयचे पदाधिकारी आणि हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम तसेच खुलताबाद नगराध्यक्ष आमेर पटेल, सागर प्रकाश मुगदिया, मध्य विधानसभा अध्यक्ष शेख एजाज, नाजिम खान, रोहित बनकर, ऋषी खंडागळे, दुर्गेश वैद्य, माजेद पटेल, शहेजाद जैदी यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मोर्चाचे सूत्रसंचालन डॉ. शादाब शेख यांनी केले.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, मताधिकाराचे संरक्षण व्हावे आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यात यावे, या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष
वेधले.
What's Your Reaction?